*
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
राज्य मराठी पत्रकार परिषदेची घोडदौड संपूर्ण राज्यासह देशांमध्ये जोमात सुरू असून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांच्या सूचनेनुसार राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी महेंद्र पाटीलबुवा इंदोरे यांची निवड करण्यात आली असून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण पप्पू शिंदे यांनी पत्र देऊन त्यांची नुकतीच निवड केली आहे, सतर्क पोलीस टाइम्सचे मुंबई शहर प्रतिनिधी व कार्यक्षम पत्रकार म्हणून म्हणून महेंद्र इंदोरे यांची ख्याती असून भावी काळात मुंबई शहराचे जास्तीत जास्त प्रतिनिधी राज्य मराठी पत्रकार परिषदेला जोडून संघटनेशी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी याप्रसंगी बोलून दाखविला आहे, याप्रसंगी सतर्क पोलीस टाइम्सचे संपादक डॉ.शमशुद्दीन शेख यासह राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर उपस्थित होते


















