वाशिम:- दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी श्री प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आकाश चव्हाण सर हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय समन्वयक प्रा.जी.बी. बनचरे हे उपस्थित होते. सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विनोद राठोड यांनी आपल्या प्रास्ताविकेतून राष्ट्रीय सेवा योजना स्थापना मागचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. जी.बी बनचरे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांमधील विविध स सुप्त गुण तथा कौशल्याचा विकास होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो असे सांगितले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमुळे सामाजिक जाणीव निर्माण होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कार्यप्रवणता निर्माण होऊन तो देशाचा आदर्श नागरिक बनू शकतो असे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आकाश चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व स्पष्ट करून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे नियमित कार्यक्रम आणि विशेष शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
