आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
प्रति,
मा. अध्यक्ष व पदाधिकारी,
पुणे बार असोसिएशन, शिवाजीनगर
विषय: पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापनेस समर्थन..
महोदय,
आमच्या बार मध्ये एकूण ……. संख्या आहे. पुणेकरांचे दशकानुदशकांपासूनचे स्वप्न आणि न्यायाचा अधिकार — पुण्यातील उच्च न्यायालयाचे खंडपीठ/ सर्किट बेंच, या विषयावर आपल्या असोसिएशनने घेतलेली भुमिका ही लोकशाहीच्या, लोकहिताच्या आणि पक्षकार यांच्या हक्काच्या रक्षणासाठी एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ही मागणी केवळ वकिलांची नसून संपुर्ण पक्षकार आणि कोट्यवधी नागरिकांची असुन, ती पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची “न्यायसुलभतेसाठीची हाक.”
मुंबईला पुन्हा पुन्हा प्रवास करणे ही फक्त शारीरिक व आर्थिक झळ नाही, तर एक मानसिक यातनाही आहे. याला पर्याय म्हणून पुण्यात खंडपीठ स्थापन झाले, तर न्याय मिळविणे सोपे होईल, वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होईल. अनेक शासकीय अधिकारी हे देखील सरकारी कामानिमित मुंबई मध्ये जावे लागते.
या योग्य आणि दूरदृष्टीपूर्ण मागणीस आमच्या संस्थेचा / पक्षाचा ठाम पाठिंबा आहे.
आम्ही आपल्या बरोबर खंबीरपणे उभे आहोत — न्यायासाठी, जनहितासाठी, आणि पुणेकरांच्या न्यायहक्कासाठी!
आपला विश्वासू,
