प्रवीण पप्पू शिंदे
अवसरी खुर्द गावामध्ये अदानी कंपनीचे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याचे काम चालू असून त्याअंतर्गत काही ग्रामस्थांचे जुने मीटर बदलण्यात आले आहेत व त्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत
हे मीटर बसवल्यानंतर वाढीव दराने विज बिल येत असल्याने यासाठी विरोध म्हणून महावितरण कंपनी अवसरी खुर्दच्या कार्यालयामध्ये एक महिन्यापूर्वी हे स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नयेत म्हणून पत्र दिले होते त्याचप्रमाणे अवसरी खुर्द ग्रामपंचायत मध्ये सुद्धा असे प्रीपेड मीटर बसवू नयेत म्हणून ग्रामसभेमध्ये ठराव करून महावितरण कंपनीस द्यावा अशा आशयाचे पत्र देण्यात आले होते.
त्यावेळी हे काम तात्पुरते थांबवण्यात आले होते परंतु पुढील वीज बिल आल्यावर असे लक्षात आले की बऱ्याच लाईट बिलांमध्ये योग्य रीडिंग देण्यात आले नाही तसेच रीडिंग च्या जागी (उपलब्ध नाही)असा शेरा मारण्यात आला व अंदाजे वाढीव बिल देण्यात आले
याचा जाब विचारण्यासाठी गेल्या आठवड्यात महावितरणचे अधिकारी शिंदे ह्यांनी हे मीटर खराब असून ते बदलावे लागतील व त्या जागी अदानी कंपनीचे नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर लावावे लागतील असे सांगितले
एकंदरीत हे सर्व ठरवून करण्यात येत आहे व हे मीटर बसविल्यामुळे नवीन वाढीव दराने विज बिल दिले जाणार आहे,मनमानी पद्धतीने युनिटचा दर आकारला जाईल व त्या नवीन स्मार्ट मीटरचे अंदाजे 20,000 हजार रुपये ग्राहकाच्या माती मारली जाणार असल्यामुळे
ग्रामपंचायत अवसरी खुर्दच्या पुढाकाराने सर्व ग्राहकांच्या हरकती मागवण्यात येत असून हरकती नोंदवाव्यात यासाठीचे दोन फॉर्म तयार करण्यात आले आहेत
1. एक फॉर्म वीज मीटर बसवू नयेत म्हणून आहे
2. दुसरा फॉर्म ज्यांच्याकडे स्मार्ट मीटर बसले आहेत ते बदली करून जुने मीटर देण्यात यावेत अशा संदर्भाचा आहे या दोन फॉर्म पैकी योग्य फॉर्म भरून त्यासोबत लाईट बिलाची एक प्रत जोडून गुरुवार दिनांक 17/07/2025 रोजी सकाळी 10 वाजता महावितरण कार्यालय अवसरी खुर्द येथे उपस्थित राहण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे
