*
प्रवीण शिंदे
अवसरी मधील तांबडे मळा तालुका आंबेगाव येथे नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू असून या पेट्रोल पंपासाठी अकरा केवीची विद्युत लाईन ही लोकवस्ती मधून जात आहे भविष्यामध्ये वीज, वादळ, वारा अशी नैसर्गिक आपत्ती झाल्यास तेथील पोल लोकांच्या अंगणामध्ये पडून फार मोठी जीवित हानी किंवा मोठी आपत्ती येऊ शकते, हे संकट येऊ नये यासाठी पेट्रोल पंपासाठी लागणारी लाईन दुसऱ्या मार्गाने नेण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ रवीना भोर, संतोष भोर, मनोज भोर, अमोल भोर, सूर्यकांत भोर, लक्ष्मण भोर या ग्रामस्थांनी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे, पेट्रोल पंपासाठी जाणारी लाईन नेण्यास आमची हरकत नसून फक्त ही लाईन दुसऱ्या मार्गाने न्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असूनही ही लाईन टाकण्याचे काम व पोल टाकण्याचे काम जोरात सुरू होते याला नागरिकांनी विरोध केला असता त्यांना कंत्राटदार व त्यांच्या कामगारांनी स्थानिक नागरिकांना दमदाटी केली आहे, हतबल झालेल्या नागरिकानी महावितरण कंपनीने विद्युत मार्ग न बदलल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
