🕉️
ऐतिहासिक पाऊल..! भीमाशंकरच्या कुंभमेळ्यासाठी 288 कोटींचा विकास आराखड्यास मान्यता
प्रवीण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
2027 मध्ये होणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी उभारल्या जाणाऱ्या 288.17 कोटींच्या विस्तृत विकास आराखड्यास मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार,सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्यासह शिखर समिती सदस्य म्हणून मा.दिलीपराव वळसे पाटील साहेब प्रमुख उपस्थित होते.
या योजनेंतर्गत मंदिर परिसर,वाहनतळ,भाविक सुविधा केंद्र,बस स्थानक,शौचालये, लॉकर,दुकाने व दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा आदी विकासकामांचा समावेश असून,संपूर्ण परिसराच्या अध्यात्मिक आणि पायाभूत विकासाला गती मिळणार आहे.त्यामुळे भीमाशंकर मंदिर परिसराचा कायापालट होणार यात शंका नाही.
