आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील माजी सरपंच प्रभाकरराव पेंटे यांच्या खरबाच्या शेतातील पडक्या विहीरीत दोन चार दिवसांपासून अडकून पडलेल्या रानमांजरास शनिवारी संबंधित वन विभाग व परिसरातील वन्य जीव प्रेमींनी मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढून जीवदान दिले आहे. आदमपूर वन परिसरातील वनरक्षक सहदेव दोसलवार यांना माहिती कळताच त्यांनी रानमांजरीला वर काढण्याचे नियोजन लावले. उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक भारत खेलवाडे, देगलूर वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी संतवाले, वनपाल अभय शेवाळकर यांच्या मार्गदर्शनात माजी सरपंच प्रभाकर पेंटे, वनमजूर सुभाष नाईक मिनकीकर, बालाजी आरोटे केरूरकर, शिवा पैलवार मिनकीकर, सर्पमित्र राज मुंडकर आणि वन्यजीवप्रेमी जाफर आदमपूरकर आदींनी दोरखंडाच्या सहाय्याने रानमांजरीला सुरक्षित वर काढीत जीवदान दिले. त्यानंतर नैसर्गिक अधिवासात रानमांजरीला मुक्त करण्यात आले.
