सचिन संघई
जिल्हा प्रतिनिधी वाशिम
वाशिम :- श्री. प.दी जैन कला महाविद्यालय अनसिंग राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2025 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ पंकज शर्मा यांनी महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना आरोग्यदायी मानवी जीवनासाठी योग, प्राणायामाचे महत्त्व समजून सांगितले तसेच त्यांनी काही योगासन, प्राणायामाची प्रात्यक्षिक करून सहभागी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांना योग प्राणायामाचे धडे दिले तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. राठोड यांनी शारीरिक तथा मानसिक स्वास्थासाठी योगाचे महत्त्व पटवून दिले. आरोग्य हीच खरी संपत्ती असून मानसिक व शारीरिक स्वास्थ जपण्यासाठी प्रत्येकाने दररोज योगासन ,प्राणायाम करण्याची आवाहन याप्रसंगी राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्रा. राठोड यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी तथा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
