आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
तसेच नोंदणीकृत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणी या बाबत मंत्रालयातील नरिमन भवन येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आस्थापनांची नोंदणी आणि खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवणे ही मंडळाचे मुख्य जबाबदारी असून ही सर्व कामे नियमित आणि प्रभावीपणे झाली पाहिजे असे निर्देश देत स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची आवश्यकता असून सुरक्षारक्षकाच्या नोंदणीपासून आस्थापनांच्या तपासणी पर्यंत सर्व कामे कालबद्ध पद्धतीने महिनाभराच्या कालावधीत पूर्ण करावी अशा सूचना यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वांना दिल्या.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीस विधान परिषद आमदार श्री. विक्रांत पाटील, कामगार विभागाचे प्रधान सचिव श्री. आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त श्री.एच.पी. तुम्मौड, उपसचिव श्री.स्वप्नील कापडणीस यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी व संबंधित विभागातील अधिकारी सहभागी #रोजगार_संधी #आढावा_बैठक



















