अवसरी खुर्द खडक मळा तालुका आंबेगाव येथे काल झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर पावसाचे पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत, येथे अनेक दिवसापासून रस्त्याचे काम सुरू असून रस्ता खोदून ठेवल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून कंत्राटदाराने केलेल्या हलगर्जीपणामुळे अनेक दिवसापासून काम जैसे थे अवस्थेत आहे , रस्त्यावर चिखलाचा राडा झाला असून या रस्त्याने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे, रस्त्यावर गाड्या घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे, प्रवास करताना वाहनांची प्रचंड कसरत होत असून या कामाला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्यामुळे प्रवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी पहिल्याच पावसात दाणादान झाल्यामुळे नागरिक हवालदिन झाले आहेत.




















