आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनवाहिन्या असलेल्या पवना व इंद्रायणी नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी आम्ही ठाम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहोत. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबवाव्यात, यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे.
या अनुषंगाने नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नगरविकास राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत इंद्रायणी नदी उगमापासून ते संगमापर्यंत प्रदूषणमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वसमावेशक उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.
विशेषतः इंद्रायणी नदीचे पाणी पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करण्यापूर्वी नदीच्या प्रवाहातील गावांमध्ये एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्प उभारण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. याबाबत माननीय मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली असता, त्यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका व्यक्त करत आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले.
पवना व इंद्रायणी नद्या स्वच्छ, निर्मळ आणि प्रवाही ठेवण्यासाठी प्रशासन, शासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातूनच हे उद्दिष्ट साध्य होणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
निरंतर विश्वास पिंपरी-चिंचवडकरांचा,
संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा..!




















