🎉
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय विवेक वळसे पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
जिद्द, चिकाटी आणि संयम यांच्या बळावर गेली अनेक वर्षे त्यांनी सक्रिय राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकासकामांचे नियोजन, लोकाभिमुख निर्णय आणि काम पूर्णत्वास नेण्याची त्यांची हातोटी विशेष उल्लेखनीय आहे.
स्वर्गीय माजी आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रतापराव वळसे पाटील यांच्या विचारांचा व सामाजिक जाणिवांचा वारसा त्यांना लाभला आहे. सध्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना नागरिकांना न्याय देणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रामाणिकपणे काम करणे ही त्यांची कार्यशैली ठरली आहे.
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐



















