‘ ‘
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
दूषण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर कारखाने व वाहनांमधून बाहेर पडणारा धूर,
रसायनमिश्रित सांडपाणी किंवा प्लास्टिक कचरा असेच चित्र डोळ्या समोर येते;
पण आता वातावरणाच्या वरच्या थरामध्येदेखील अवकाशातून रासायनिक प्रदूषण होत आहे असे नमूद करून त्यासाठी कोणत्या बाबी कारणीभूत ठरत आहेत यावर सर्वस्पर्शी भाष्य करणार्या या विचारप्रवर्तक लेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
इंटरनेट सेवा,
नेव्हिगेशन,हवामानाचा अंदाज,पृथ्वी निरीक्षण आदी अनेक उद्देशाने अवकाशात सोडण्यात आलेल्या व पृथ्वीभोवती फिरणार्या हजारो लहान-मोठ्या उपग्रहाचे आयुष्य साधारणपणे पाच वर्षाचे असते.
नियंत्रणात नसलेले हे निकामी उपग्रह कार्यरत असणार्या इतर उपग्रहावर आदळण्याचा धोका असतो.निकामी झालेल्या उपग्रहामुळे अवकाशात कचरा वाढू नये;आणि नवीन उपग्रहांसाठी ठराविक कक्षांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध व्हावी या कारणांमुळे त्यांना नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात आणले जाते.जसजसे ते पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तसतसे प्रचंड घर्षणामुळे तापमान हजारो अंशांपर्यंत वाढते.
साधारणपणे,पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ८० ते १२० किलोमीटर उंचीवर म्हणजेच वातावरणाच्या वरच्या थरात येताच ते वेगाने जळू लागतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यापूर्वींच बहुतांश उपग्रह पूर्णपणे नष्ट होतात,तेव्हा ते वातावरणाच्या वरच्या थरात रासायनिक पदार्थाचा वर्षाव करतात.यामुळे साहजिकच रासायनिक प्रदूषण होते.हे प्रदूषण करण्यात मोठा घटक म्हणजे ॲल्युमिनियम.
जळणार्या ॲल्युमिनियमचे रूपांतर ॲल्युमिनियम ऑक्साइड तथा ॲल्युमिनामध्ये होते. त्याचे कण,सूर्यापासून उत्सर्जित होणार्या घातक अतिनील किरणाना शोषून पृथ्वीवरील जीवनांचे रक्षण करणार्या ओझोन थराला नुकसान पोहोचवू शकतो.राॅकेट प्रक्षेपणांमुळे ओझोन थराला तात्पुरती छिद्रे पडत असताना त्यात आता मात्र दररोज जळून नष्ट होणार्या कृत्रिम उपग्रहांमुळे हा परिणाम वाढण्याची भीती आहे.
उपग्रह जळताना काजळीच्या स्वरूपात कार्बन तयार होतो ही काजळी सूर्यप्रकाश शोषून तापमान वाढवते तसेच
ओझोनचे थरातून जात असल्यामुळे ओझोनचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.सध्या दररोज तीन उपग्रह किंवा अग्निबाणाचे अवशेष वातावरणात जळून नष्ट केले जातात.
यामुळे दरवर्षी सुमारे एक हजार टन रासायनिक पदार्थ पृथ्वीच्या वातावरणात ‘स्थितांबर ‘ आणि ‘मध्यांबर’ या वरच्या थरात मिसळत आहेत.जर्मनीतील ‘लायब्नित्झ इन्स्टिट्यूट ऑफ ॲटमाॅस्फेरिक फिजिक्स ‘या संस्थेमधील शास्रज्ञांनी ‘लिडार’ हे वातावरणातील घटकांचे मोजमाप करणारे उपकरण कार्यान्वित केले.सुमारे वीस तासानंतर या उपकरणाने पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरांमध्ये लिथियमच्या प्रमाणात दहा पट वाढ झाल्याची नोंद केली.
कृत्रिम उपग्रहांच्या ज्वलनातील रासायनिक प्रदूषणाचा अभ्यास ‘युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो ‘ मधील शास्रज्ञ करत आहेत.त्यांनी केलेल्या संगणकीय प्रारूपानुसार भविष्यात पृथ्वीच्या निम्न कक्षेत साठ हजार किंवा त्याहीपेक्षा अधिक अल्पायुषी उपग्रह भ्रमण करत असतील आणि दरवर्षी निकामी होणारे हजारो उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात आणून नष्ट केले जातील.अशा परिस्थितीत ॲल्युमिनियम ऑक्साइडसारख्या कणांमुळे तापमान दीड अंश सेल्सिअसने वाढू शकते आणि ध्रुवीय वार्यांच्या गतीतही बदल होऊ शकतो.पृथ्वीच्या वातावरणामध्ये उपग्रह कशा पद्धतीने प्रवेश करतील,त्यांच्या ज्वलनातून हानिकारक रसायनांचे प्रमाण कसे कमी करता येईल,किंवा निकामी होणार्या उपग्रहांची दुरूस्ती अवकाशातच करून त्यांचे आयुष्य वाढविता येईल का,अशा अंगांनी शास्रज्ञ विचार करत आहेत.सध्या उपग्रहांच्या ज्वलनामुळे होणारे रासायनिक प्रदूषण धोकादायक नसले तरी तरी हे संकट आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन आहे,हे नक्की! विज्ञानप्रसारक हेमंत लागवणकर यांनी अवकाशात होणार्या रासायनिक प्रदूषणाचे संदर्भात आपल्या लेखात तपशीलात विशद केलेली ही अभ्यासपूर्ण माहिती खरोखरच उल्लेखनीय,
वाचनीय,विचारप्रवर्तक व अनभिज्ञ वाचकांच्या ज्ञानात भर घालतानाच त्यांना विदारक वास्तवाची जाणीव करून देणारी ठरते हे मात्र तितकेच




















