जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
व इतर काही सामाजिक संघटना व पत्रकारांनी दिला सक्रिय पाठिंबा..
आज 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण सभांगे साहेब यांना पीएसआय शेटे साहेब यांच्या हस्ते निषेध पत्रक देण्यात आले
राज्य मराठी पत्रकार परिषद संघटना.. पदाधिकारी यांचे निषेध पत्रकामध्ये पुढील प्रमाणे कैफियत मांडण्यात आली आहे…
आम्ही पुढील प्रमाणे सह्या करणार राज्य मराठी पत्रकार परिषद सर्व सदस्य पदाधिकारी आपणास कळवू इच्छितो की आमच्या संघटनेचे जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अजित गाडगे हे निमगाव सावा येथे ट्रुथ सोशल मीडिया या चॅनलचं काम पाहत आहेत. आमच्या संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत. त्यांना दिनांक 27 एप्रिल रोजी निमगाव सावा येथे एक बातमी केल्याच्या रागातून काही दंडेलशाही व गुंडगिरी करणाऱ्या लोकांनी जबरी मारहाण केली आहे. सदर बातमीमध्ये उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू ह्या मथळ्याखाली सदर बातमी प्रकाशित त्यांनी केली होती. सदर बातमी ही तेथील साईदीप हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या बाईटनुसार करण्यात आली होती. परंतु मृत झालेल्या त्या महिलेचे नातेवाईक ग्रामपंचायत सदस्य बाबाजी घाडगे व इतर पाच ते सहा जणांनी अजित घाडगे यांना एकटे गाठून त्यांना डोक्यामध्ये बुक्क्या मारून व शिवीगाळ करून व हाताने मारहाण करून जखमी केले आहे. सदर घटनेचा आम्ही सर्व तीव्र शब्दात निषेध करत आहोत.. महोदय आपण आपल्या स्तरावर सदर आरोपीला पोलीस स्टेशनला बोलावून योग्य ती आपल्या नियमानुसार कारवाई करावी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या व लोकशाहीचा कणा कणखर व मजबूत करण्यासाठी पुढे येऊ पाहणाऱ्या नवीन उद्योगमुख पत्रकारांवर असे हल्ले होत असतील तर येणाऱ्या दिवसांमध्ये वार्तांकन करण्यासाठी कोणताही पत्रकार किंवा युवक किंवा युवती पुढे येणार नाही. आपण आपल्या भागामध्ये आतापर्यंत गुन्हेगारी मोडीत काढली असून येणाऱ्या दिवसांमध्ये सुद्धा आपलं कार्य हे त्याचप्रमाणे असेल यात शंका नाही आपण योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा बाळगत आहोत…….
निषेध पत्रकावर पुढील प्रमाणे राज्य मराठी पत्रकार परिषद व इतर पत्रकार संघटना व लोकभारती संघटना यांच्या सह्या आहेत ..
राज्य उपाध्यक्ष प्रवीण शिंदे राज्य निरीक्षक संदीप नाईक पुणे जिल्हा अध्यक्ष रायचंद शिंदे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत शिरतर जिल्हा कार्याध्यक्ष आयुब शेख..
जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अजित घाडगे..जुन्नर शहर अध्यक्ष मुबीन जमादार..
आंबेगाव तालुका अध्यक्ष नवीन सोनवणे.. पत्रकार रवी कोळी पत्रकार किशोर वारुळे लोकभारती संघटनेचे खालीद पटेल इरफान भाई चौगुले… कार्याध्यक्ष संतोष माठे.. इत्यादी पत्रकार बांधव यांनी सदर झालेल्या माननीय निषेध व्यक्त केला व पोलिसांनी कडक कारवाई करावी असे निषेध पत्रक ना.गाव पोलिसांना दिले रिपोर्ट नारायणगाव जुन्नर पुणे
……..
..

















