*
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
जुन्नर येथील पत्रकार अजित घाडगे यांना झालेल्या मारहाणी संदर्भात कारवाई करावी यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषद व इतर काही सामाजिक संघटना व पत्रकारांनी एकत्र येऊन नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण सभांगे यांना पीएसआय शेटे यांच्या हस्ते निषेध पत्रक देण्यात आले
राज्य मराठी पत्रकार परिषद संघटनेचे जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अजित गाडगे हे निमगाव सावा येथे ट्रुथ सोशल मीडिया या चॅनलचं काम पाहत असून त्यांना २७ एप्रिल रोजी निमगाव सावा येथे एक बातमी केल्याच्या रागातून काही दंडेलशाही व गुंडगिरी करणाऱ्या लोकांनी जबरी मारहाण केली, उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू ह्या मथळ्याखाली सदर बातमी त्यांनी प्रकाशित केली होती. सदर बातमी ही तेथील साईदीप हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या बाईटनुसार करण्यात आली होती. परंतु मृत झालेल्या त्या महिलेचे नातेवाईक ग्रामपंचायत सदस्य बाबाजी घाडगे व इतर पाच ते सहा जणांनी अजित घाडगे यांना एकटे गाठून त्यांना डोक्यामध्ये बुक्क्या मारून व शिवीगाळ करून व हाताने मारहाण करून जखमी केले, या घटनेबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला असून आरोपींवर तातडीने योग्य ती कारवाई करण्यात यावी,लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या व लोकशाहीचा कणा कणखर व मजबूत करण्यासाठी पुढे येऊ पाहणाऱ्या नवीन उदयोन्मुख पत्रकारांवर असे हल्ले होत असतील तर येणाऱ्या दिवसांमध्ये वार्तांकन करण्यासाठी कोणताही पत्रकार किंवा युवक किंवा युवती पुढे येणार नाही अशा आशयाचे निवेदन राज्य मराठी पत्रकार परिषद व इतर पत्रकार संघटना तसेच लोकभारती संघटना यांनी एकत्रित येऊन पोलीस स्टेशनला दिले आहे, या प्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे राज्य निरीक्षक संदीप नाईक पुणे जिल्हा अध्यक्ष रायचंद शिंदे पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत शिरतर जिल्हा कार्याध्यक्ष आयुब शेख,जुन्नर तालुका कार्याध्यक्ष अजित घाडगे,जुन्नर शहर अध्यक्ष मुबीन जमादार,आंबेगाव तालुका अध्यक्ष नवीन सोनवणे, पत्रकार रवी कोळी पत्रकार किशोर वारुळे लोकभारती संघटनेचे खालीद पटेल, इरफान भाई चौगुले, कार्याध्यक्ष संतोष माठे सह असंख्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

















