*
—————-
संकलन श्री दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
*कथा*
दोन जिवलग मित्र वाळवंटातून प्रवास करत होते. भर दुपारची वेळ, ऊन कडक आणि पाणी संपलेले. तहानेने व्याकूळ होऊन दोघांचे भांडण झाले. रागाच्या भरात एका मित्राने दुसऱ्याच्या गालात जोरात चपराक मारली.
ज्याला चपराक बसली तो काही बोलला नाही. त्याने फक्त खाली वाकून वाळूत बोटाने लिहिले:
*”आज माझ्या जिवलग मित्राने मला मारले.”*
पुढे चालत चालत त्यांना एक ओअॅसिस लागला. पाणी बघून दोघेही धावले. चपराक खाल्लेला मित्र पाण्यात उतरला आणि अचानक खोल डोहात बुडायला लागला. ज्या मित्राने मारले होते, त्यानेच धावत जाऊन त्याला बाहेर काढले आणि जीव वाचवला.
सावध झाल्यावर त्या मित्राने एक दगड घेतला आणि त्यावर कोरले:
*”आज माझ्या जिवलग मित्राने माझा जीव वाचवला.”*
हे बघून दुसरा मित्र चकित झाला. त्याने विचारले, “मी तुला मारले तेव्हा तू वाळूत लिहिलेस, आणि जीव वाचवला तेव्हा दगडावर कोरलेस. असे का?”
पहिला मित्र हसून म्हणाला, “जेव्हा कुणी आपल्याला दुखावते, तेव्हा ते वाळूत लिहावे. क्षमेच्या वाऱ्याने ते पुसले जावे. पण जेव्हा कुणी आपल्यावर उपकार करते, तेव्हा ते दगडावर कोरावे. जेणेकरून कुठलाच वारा ते पुसू शकणार नाही.”
*बोध*
*आयुष्यात वाईट गोष्टी विसरायला शिका आणि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवायला शिका. नाती टिकतात ती क्षमा करण्याने आणि कृतज्ञता जपण्याने.*


















