जिल्हा प्रतिनिधी पुणे.
प्रवीण पप्पू शिंदे
➖➖➖
*सुरु ऊस*
*थंडीपासून संरक्षणाच्या उपाययोजना*
✦
👉🏽एकरी शेणखत १० टन/ कंपोस्ट ५ टन/ गांडूळखत २ टन/ प्रेसमड २ टन/ कोंबडीखत २ टन मिसळावे. सोबत ट्रायकोडर्मा, पीएसबी, केएमबी १-२ किलो सेंद्रिय खतात मिसळून वापर करावा. त्याचप्रमाणे जीवामृताचा एकरी २००-२५० लिटर याप्रमाणात वापर करावा.
✦माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा वापर
👉🏽थंडीत जास्त नत्र दिल्यास फक्त ऊस हिरवा दिसतो, परंतु त्याच्यामध्ये साख रसंचय कमी होतो. स्फुरदामुळे मुळांची वाढ, ऊर्जा संचय वाढतो. पालाशमुळे पेशीभित्ती मजबूत राहतात. साखर संचय सुधारतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते. झिंक, लोह, मॅंगेनीज किंवा बोरॉन ही सूक्ष्मअन्नद्रव्ये उसामध्ये साखरेच्या गुणवत्तेसाठी तसेच मुळांच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत.
👉🏽मल्टी मॅक्रोन्यूट्रीएंट आणि मल्टी मायक्रोन्यूट्रीएंट प्रत्येकी १० मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वसंत ऊर्जा ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉🏽ह्युमिक ॲसिड १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
👉🏽१% पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी.
👉🏽झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी ५ टक्क्यांप्रमाणे एकत्रित फवारणी करावी.
✦पाचट आच्छादन
👉🏽उसामध्ये खालील वाळलेली पाने काढून सरीत पाचट आच्छादन करावे.
✦पाणी व्यवस्थापन
👉🏽गरजेनुसार हलके सिंचन करावे. पिकाची वाढ कमी होऊ नये, मुळांपर्यंत पुरेसे पाणी द्यावे.
👉🏽ठिबक सिंचन पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचविते, जलव्यवस्थापन नियंत्रित राहते.
👉🏽सकाळी ८-१० वाजता किंवा संध्याकाळी ४-६ वाजता पाणी द्यावे. रात्री मोकाट सरीमध्ये पाणी देणे टाळावे.
👉🏽खारवटपणा कमी असलेले पाणी वापरावे.
➖➖➖
*खोडवा ऊस*
*पाचटाचे महत्व*
उसाचे पाचट शेतातच कुजविल्यास त्याचा पिकासाठी तसेच जमिनीस चांगला फायदा होतो. पाचटामध्ये ०.५ टक्के नत्र, ०.२ टक्के स्फुरद आणि ०.७ ते १ टक्के पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब ही अन्नद्रव्य असतात. एक हेक्टर क्षेत्रामधून ८ ते १० टन पाचट मिळते. त्यापासून ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद, ७५ ते १०० किलो पालाश, ३० ते ४० हजार किलो सेंद्रिय कर्ब आणि २.५ टन सेंद्रिय खत उपलब्ध होते. असे पाचट जाळल्याने त्यातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग जळून जातो. त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत जाते.
➖


















