संतुलन संस्थेच्या संचालिका अँड.पल्लवी रेगे यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल श्री. शंभुराज्याभिषेक ट्रस्ट, पुणे यांचे वतीने ‘शिव सन्मान पुरस्कार’ नुकताच प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्काराचा वितरण सोहळा लाल महाल, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, श्री शंभूराज्याभिषेक ट्रस्टचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्या शुभहस्ते अँड.पल्लवी रेगे यांना हा सन्मान मिळाला.
सोहळ्यात बोलताना मंगेश चिवटे यांनी अँड. पल्लवी रेगे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, त्यांना दिलेला पुरस्कार सामाजिक क्षेत्रात त्यांच्या योगदानाचा आदर आहे, अँड रेगे यांनी विविध सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण, आणि समाजातील वंचित घटकांसाठी केलेल्या कामामुळे अनेकांना जीवनात नवा आशेचा किरण दाखविला आहे.
पल्लवी रेगे यांनी या सन्मानासाठी ट्रस्ट आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले. शेखर पाटील यांनी सांगितले की, शिवछत्रपतींचे विचार आणि शंभूराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी आणि महाराजांची रणनीती, घटना, आचार, विचार, हिंदुस्थानातील प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे व्हाट्सअप, फेसबुक,इंस्टाग्राम आणि रील च्या जमान्यांमध्ये राजांचे विचार आपण कुठेतरी विसरत चाललो आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. समाजातील कार्य करणाऱ्या लोकांविषयी वेगळी भावना निर्माण झाली आहे. “सामाजिक कार्य हे केवळ एक व्यवसाय नाही, तर एक मिशन आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.”
शिव गौरव गाथा सोहळ्याला अनेक समाजसेवी,शासकीय अधिकारी, वकील, शेतकरी, वारकरी, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांनी अँड पल्लवी रेगे यांच्या सामाजिक कार्याची स्तुती केली आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

















