.
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
स्वातंत्र्यसैनिक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते, गोवा मुक्ती व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील, गिरणी कामगारांचे झुंजार नेते, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आणि विरोधी पक्ष नेते व लोकप्रिय आमदार दिवंगत कॉम्रेड गुलाबराव भाऊराव गणाचार्य यांचा ५२ वा स्मृतिदिना निमित्त गुरुवार, दिनांक २० नोव्हेंबर 2025 रोजी चिंचपोकळी (पश्चिम) येथे कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य चौक (आर्थर रोड नाका) मुंबई येथे सकाळी १० वाजता त्यांच्या स्मारका जवळ अभिवादन करण्यात येणार आहे.
विविध पक्षातील कार्यकर्ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करती असे कॉ. गुलाबराव गणाचार्य मेमोरियल संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल गणाचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.



















