*दंडवतलीलास्मृती व श्रीसंतएकनाथमहाराजकृत ग्रंथमाला ग्रंथ प्रकाशन सोहळा*
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
*प्रकाशक/संग्राहक आचार्य अमृताश्रमस्वामी महाराज*
आज कार्तिक वद्य द्वादशी या पवित्र मुहूर्तावर श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या पर्वकालावधीमध्ये श्रीअमृतनाथ स्वामी मठ श्रीक्षेत्र आळंदी येथे. श्रीगुरु चैतन्य महाराज देगलूरकर, पूज्य श्रीबाबा, श्री.माधवदासजी महाराज राठी, श्री.विकासानंद महाराज मिसाळ, श्री लोकेश चैतन्य पंढरपूर, श्री.संतोषानंदजी शास्त्री , श्री.पुरुषोत्तम महाराज पाटील, श्री.कृष्णा महाराज चवरे, श्री.जयेश महाराज भाग्यवंत, श्री.रामराजे राक्षसभुवनकर. इत्यादी संत महंतांच्या व भाविकांच्या उपस्थितीमध्ये शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराजांच्या परंपरेतील #दंडवतस्वामी (माधव) यांच्या केशवकृतचरित्र ग्रंथाचे व श्रीसंत एकनाथ महाराजग्रंथमाला या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.



















