जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
शिरगाव :
सोमाटणे (ता. मावळ) येथील नरेंद्र शहाजी मुऱ्हे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा यावर्षीचा महात्मा फुले राज्यस्तरीय युवा समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला.
हा पुरस्कार वानवडी पुणे येथे २३ नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक कवी किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या १९ व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनत परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे व राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगीताई काळभोर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
समाजोपयोगी उपक्रम, युवकांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम, शिक्षण प्रसार व आरोग्य जनजागृती या माध्यमातून त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेले काम विशेष चर्चेत राहिले आहे.



















