*राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय बैठकीचे मंचर येथे आयोजन*
*सर्व
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या सर्व पुणे विभागीय पदाधीकारी व सर्व तालुका पदाधीकारी तालुका सदस्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन शनिवार दि.22 नोव्हेंबर रोजी करण्यात आले असून या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचे विषयावर चर्चा होणार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी या निमित्ताने बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संचालक मधुसूदन कुलथे व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले आहे या बैठकीमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा होणार असून जे पदाधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांना त्यांना पुढील कार्यक्रमाला बोलविण्यात येणार नाही असे सुचित करण्यात आले आहे
२०२६ वर्षाची दिनदर्शिका प्रकाशन तसेच त्यात फोटो कोणते घ्यावयाचे त्यावर चर्चा तसेच पत्रकारांसाठी स्वतंत्र्य अशा बँकेच्या निर्मिती संदर्भात चर्चा करणे अनिवार्य असून आगामी पुणे येथे होऊ घातलेल्या अधिवेशना संदर्भात चर्चा तसेच २०२६ व २७ ची कार्यकारिणी बदल व नवीन कार्यकर्त्यांना पदोन्नती वर चर्चा करण्यात येणार असून याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे




















