प्रवीण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
प्रदीप गारटकर यांनी कृष्णा भीमा विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मा. आ. यशवंत माने, भाजप नेते प्रवीण माने यांची उपस्थिती इंदापूर इंदापुर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष व इतर सहकारी पक्षाच्या वतीने इंदापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय जोडे बाजूस ठेवून कृष्णा भीमा आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उम `दवार म्हणून माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आपल्या पॅनलसह मोठे शक्ती प्रदर्शन करत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार यशवंत माने, भाजपा नेते प्रवीण म नेि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सौ. अनुराधा गारटकर, गिरीश शहा यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, मी नगराध्यक्ष व्हावे म्हणून उभा राहिलो नाही. मी ४५ वर्षांपासून समाजकारणात असून सर्वसाम त्यांना न्याय देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. त्यामुळे मला सर्वांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यास प्रवृत्त केले. माझी इंदापूर नगरपरिषदेवर दहा वर्ष सत्ता होती. त्यावेळी मी सर्वसामान्य कार्यकत्यांना नगराध्यक्ष तर शेकडो जणांना नगरसेवक बनविले. त्यामुळे मला या पदाची शौक नाही, पण इंदापूरच्या लोकप्रतिनिधीने अनेक कार्यकर्ते संपवण्याचे कट कारस्थान चालवले आहे. मी जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी राजकीय, सार्वजनिक बावीस सतत बगल द्यायचा प्रयत्न करून चांगल्या कार्यकत्यांना संपवण्याचे काम केले आहे, करत आहेत. पक्षश्रेष्ठी आणि इंदापुरातल्या नेत्यांनी एकतर्फी हुकूमशाही चालवली आहे. पक्ष हा कार्यकर्ते व संघटना यामुळे मोता होता. पक्ष कार्यकर्त्याच्या जीवावर चालतो मात्र येथे प्रामाणिक कार्यकर्ते संपविण्याचा प्रयत्न होत असल्याने मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन कृष्णा भीमा आघाडीतून उम `दवारी अर्ज भरला आहे. मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणावर उस्फूर्तपणे उपस्थित आहेत. मी उमेदवार नसून इंदापुरातला प्रत्येक रहिवासी हा नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, लोकशाही मध्ये लोकसेवेचे महत्त्वपूर्ण स्थान असून प्रदीप गारटकर हे लोकसेवक आहेत. नगरपरिषदेवर त्यांची दहा तर आमची १५ वर्ष सत्ता होती. आम्ही विरोधक होतो मात्र आता स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र आलो आहे. गारटकर हे आपण दुसऱ्या कार्यकर्त्यांस तिकीट देऊ म्हणत होते मात्र आम्ही त्यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून लढण्यासाठी तयार केले.




















