आनंद कुरुडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ: बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे 8 सप्टेंबर रोजी सेवा सहकारी सोसायटी निवड प्रक्रिया पार पडली असुन चेअरमन पदी शेषराव केरबा रोकडे तर व्हाईस चेरमनपदी हणमंत हौसाजी पाटील वाडेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
बिलोली तालुक्यात अनेक सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध निघाले आहेत त्याचाच आदर्श डोळ्या समोर ठेवून व माजी मंत्री,माजी खासदार, भास्करराव पाटील खतगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभासदांना बोलावून घेऊन रामतीर्थ सेवा सहकारी सोसायटी,बिनविरोध काढण्यात आली
निवडीच्या रोजी रामतीर्थ सेवा सहकारी सोसायटी कार्यालय येथे निवडणूक अधिकारी ए.एस.पाटील, एन.ई.मटवाले,वाय.के.शेख यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध चेअरमन पदी केशवराव पाटील रोकडे तर व्हाईस चेअरमन पदी हनमंत पाटील वाडेकर यांची निवड करण्यात आली
यावेळी माजी उपसरपंच संतोष पाटील पुयड,शिवाजी पा देगलूरे,बाजीराव पा रोकडे,राम पा देगलूरे,आनंदराव पा रोकडे,बाळवंत पा वाडेकर,व्यंकटराव पा रोकडे,मधूकर पा रोकडे,व्यंकटराव पा रोकडे,माधवराव पा पूयड,दादाराव पा पूयड,मनोहर पा रोकडे,संजय पा पूयड,संतोष पा देगलूरे,प्रकाश पा रोकडे,जगदीश पा वाडेकर,मंगलबाई पूयड,निलाबाई रोकडे,पोर्णिमा भंडारे,सुधाकर पांचाळ,प्रा.राजेश पा रोकडे,धोंडीबा पा तोडे,दिगाबंर पा चंदणे,बालाजी पा रोकडे,गंगाधर संकटे,श्रीनिवास पा पूयड,मारोती वाघमारे,सुनिल कांबळे,जयदीप कांबळे,देविदास चंदणे,
