*
प्रवीण (पप्पू) शिंदे
महसूल सप्ताह 2025 निमित्त आयोजित कार्यक्रम मध्ये मा उपविभागीय अधिकारी श्री गोविंद शिंदे यांच्या हस्ते व मा श्री संजय नागटिळक ( तहसिलदार आंबेगाव )व डॉ. सुनील शेळके तहसीलदार जुन्नर यांच्या उपस्थितीत श्री.डॉ सचिन वाघ नायब तहसीलदार, तहसिल कार्यालय आंबेगाव यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट नायब तहसीलदार’ म्हणून पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागात नेत्रदिपक कामगिरी बजावणाऱ्या व कायदा सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, मदत व पुनर्वसन, महसूल वसूली, निवडणुका तसेच प्रशासन इत्यादी जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत क्षेत्रामध्ये निस्पृह वृत्तीने काम करुन शासनाची जनसामान्यांतील प्रतिमा उंचावणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचारी यांना ‘महसूल दिना’ चे औचित्य साधून गौरविण्यात आले .
