आंनद करूडवाडे
सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ
रामतीर्थ : बिलोलो तालुक्यातील मोजे केरुर येथील महिला सरपंच दैवशीला कुरणापल्ले यांनी गावातर्गत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर बऱ्याच गावातील नागरिकांनी अतिक्रमण करून छोटे मोठे बांधकाम केले असल्याने रस्ता अगदी सहा ते सात फुटाचा अरुंद झाला होता. त्यामुळे सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेत गावातील रस्ता मोठा झाला पाहिजे हे पटवून सांगत रस्त्यावर असलेल्या सर्व नागरिकांचे अतिक्रमण काढून गावातील नागरिकांच्या रहदारीचा रस्ता जेसीबीच्या साह्याने मोकळा केला.बिलोली तालुक्यातील केरूर येथील गावात अनेक वर्षापासून गावातील मुख्य रस्ता असणारा व पुढे तांडा वस्ती जोडणाऱ्या रस्त्यावर अनेक गावकऱ्यांनी अतिक्रमण करून यावर स्वच्छालय बांधकाम, घराचे बांधकाम, जनावर गोठा बांधकाम यासह अन्य बांधकाम करत रस्ता अगदी अरुंद केला होता. रस्ता अरुंद झाल्यामुळे गावात कुठलेही वाहन येत नव्हते. त्यामुळे येथील माजी सरपंच बालाजी कुरणापल्ले व विद्यमान महिला सरपंच दैवशीला बालाजी कुरणापल्ले व ग्रामसेवक पि. डी. वाघमारे यांनी गावातील नागरिकांना रस्त्याचे महत्त्व पटवून सांगत रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी घेतली. त्यांनी घेतलेल्या जबाबदारीस गावातील विद्यमान उपसरपंच, चेअरमन, सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी साथ दिली असल्याने सदर रस्त्यावर असलेल्या जवळपास गावातील ५० ते ६० लोकांचे प्रेमाने व सामंजसाने अतिक्रमण काढून १५ फुटाचा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. अनेक वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे प्रश्न दैवशीला कुरणापल्ले या महिला सरपंचांनी आपल्या पंचवार्षिक काळात निर्णय घेउन मोकळा केले असल्याने गावकऱ्यातून त्यांचे स्वगत खुफ कौतुक होत आहे.
