*
आंबेगाव प्रवीण पप्पू शिंदे
संकलन दत्ता मोकाशी सर पिंपरी चिंचवड
आत्मविश्वास म्हणजे आरशात स्वतःकडे बघून मनापासून म्हणता येणं…
*’मी पुरेसा आहे.’*
तो कुठून विकत मिळत नाही,
तो आपल्यामध्येचं असतो,
*फक्त त्याला ओळखायचं असतं,*
*जागं करायचं असतं.*
कधी स्वतःला विचारलंत का…?
मी नेमका कोण आहे.?
माझ्यात काय कमी आहे.?
खरं सांगू….
तुमच्यात काहीच कमी नाही,
तुमचं शरीर,
तुमचं मन,
तुमची जिद्द…सगळं काही पूर्ण आहे.
*फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही,इतकंच…!*
*तुलना (Comparison)…*
*ही आत्मविश्वासाची सर्वात मोठी शत्रू आहे.*
देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलंय
मग तुम्ही दुसऱ्यासारखं का बनायचं.?
*भीती…*
ही फक्त मनाची खेळी आहे,
इंग्लिश बोलताना घाबरता,
*लोकांसमोर उभं राहताना हात थरथरतो,*
*मन म्हणतं…’नको रे… चुकशील.’*
पण आतला आवाज ओरडतो…
*’कर… काही होत नाही!’*
*आणि खरंच….*
*जास्तीत जास्त काय होईल…?*
*लोकं हसतील…?*
*टिंगल करतील…?*
करू द्या ना…!
तो त्यांचा प्रॉब्लेम आहे,
तुमचा नाही…!
*संधी…*
ही आयुष्यात वारंवार येत नाही,
एकदा आली तर पकडा तिला…!
*तुम्हाला १०० लोकांसमोर बोलायची संधी मिळाली तर,*
*घाबरू नका…*
*तिला सोनं बनवा…!*
हो… तयारी करा… अभ्यास करा.
*पण मागे हटू नका…!*
नोकरीत रिजेक्ट झालात?
परत द्या इंटरव्ह्यू,
पुन्हा…पुन्हा द्या.
*कारण हार मानणं हा पर्याय नाही.*
*लक्षात ठेवा….*
* स्वतःला तंदुरुस्त ठेवा,
* ज्ञान मिळवत रहा,
* वाचन करत रहा,
* *कुणालाही कमी लेखू नका,*
* आणि सर्वात महत्वाचं…. *स्वतःवर प्रेम करा.!*
एक दिवस असा येईल….
ज्या दिवशी तुम्ही स्वतःला सांगाल….
*मी करू शकतो,*
*आणि मी करून दाखवणारच!*
*भीती वाटली की एकचं विचार करा…*
*कुणी मला फाशी देणार आहे का…?*
उत्तर – नाही…!
*बोध*
*मग उभे रहा,*
*पुढे चला…*
*कारण…*
*डर के आगे जीत है!*
*नेहमी जलद धावात रहा,*
*धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, रांगता येत नसेल तर सरपटा पण नेहमी पुढेच जाण्याचा प्रयत्न करत रहा.*
*स्वामी विवेकानंद*
प्रवीण पप्पू शिंदे
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश
महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन

















