*
———————–
पत्रकार. प्रवीण पप्पू शिंदे
————————–
उद्या दिनांक १५ जानेवारी रोजी महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. सर्व राजकीय पक्ष मतदान करण्याचे आवाहन करत आहेत, परंतु काही लोक म्हणत असतात की “माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे?” पण एक मत किती महत्त्वाचे असते, याची काही उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत.
२०१६ साली पैठण नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगीता मापारी या नगरसेविका फक्त एका मताने विजयी झाल्या होत्या. २०२५ च्या नगरपालिका निवडणुकीत एक महिला उमेदवार केवळ एका मताने विजयी झाली, विशेषत: त्यांचे सासरे परदेशातून सून निवडनूक लढवत आहे म्हणून मतदान करण्यासाठी आले होते.
राजस्थानातील सी.पी जोशी जे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होते ते २००८ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ एका मताने पराभूत झाले होते. त्यांना ६२२१५ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी यांना ६२२१६ मते मिळाली होती. विशेषता त्यावेळेस त्यांची आई, पत्नी आणि ड्रायव्हर यांनी गावी जाऊन मतदान केले नव्हते.
१९९९ साली अनेक पक्षांच्या पाठिंब्याने अटलबिहारी वाजपेयी यांचे केंद्रात सरकार आले. त्यावेळेस त्यांच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव आला. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने पडले.
अमेरिकेची राजभाषा जर्मन असावी की इंग्रजी असावी, याबाबत १७९५ साली अमेरिकेमध्ये वाद निर्माण झाला. याचा निर्णय मतदानाने घेण्याचा ठरले. त्यावेळेस केवळ एका मताने इंग्रजी राजभाषा निश्चित झाली व जर्मन भाषेचा केवळ एका मताने पराभव झाला. एका मताने अमेरिकेची राजभाषा इंग्रजी झाली. इतके महत्व आहे एका मताला!
लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व असते. एक एक मत मिळूनच लोकशाहीमध्ये आपण आपला प्रतिनिधी निवडत असतो. एक मत नाही दिले तर काय होऊ शकते, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार उद्या बजावावा ही विनंती.
पत्रकार. प्रवीण पप्पू शिंदे



















