वै विठ्ठल महाराज राजगुरू हे उत्कृष्ट मृदंगाचार्य होते म्हणून श्री भास्करजी महाराज राजगुरू हे ६ व्या वर्षापासून किर्तनात मृदंग साथ करु लागले आहेत १९७५ ते २०२५ पर्यंत वारकरी संप्रदायात मृदंग वादन सेवा करत आहेत म्हणून च मुंबई मराठा ज्ञाती ज्ञातीच्या फळ व्यापारी ट्रस्ट तर्फे मृदंग रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे गुरुवर्य श्री पांडुरंग महाराज घुले आणि श्री भगवानशेठ थोरात फ्रुटवाले धर्मशाळा अध्यक्ष यांच्या शुभहस्ते देण्यात आला आहे कार्तिक उत्पत्ती एकादशी सायंकाळी ७ वाजता पुरस्कार सोहळा करण्यात आला आहे वै धुंडामहाराज देगलूरकर वै अमृत महाराज नागपूर संतवीर वै रामदास बाबा मनसुख वै कोंडाजी बाबा डेरे ब्रम्हलीन मोहनानंद स्वामी यांच्या किर्तनात मृदंग साथ केली आहे स्वर गंधार संगीत क्लासेस हिवरे तर्फे नारायणगाव येथे मृदंग तबला संगीत आणि वारकरी भजन हार्मोनियम शिक्षण देत आहेत मुंबई शहापूर भिवंडी मरकळ जुन्नर आंबेगाव अशा अनेक ठिकाणी क्लास घेऊन विद्यार्थी घडविले आहेत आणि आजही हे कार्य चालू आहे वारकरी संप्रदायातील काकडारती भजन संगीत भजन हार्मोनियम महिला आणि पुरुष मुले शिक्षण घेत आहेत बाहेर गावी जाऊन संगीत क्लास घेत आहेत माफक दरात आपली शिक्षण देत आहेत श्री भास्करजी महाराज राजगुरू हिवरे तर्फे नारायणगाव ता जुन्नर जि पुणे



















