जेव्हा आपल्याला वाटते की आपले प्रयत्न परिस्थिती बदलू शकत नाहीत, तेव्हा मन आपोआप हार मानण्याकडे वळते.
मानसशास्त्रात याला learned helplessness म्हटलं जातं.
जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार अडचणींना सामोरी जाते आणि प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत, तेव्हा तिच्या मनात “यातून काहीच होणार नाही” अशी भावना तयार होते.
नंतर ती परिस्थिती बदलण्याची क्षमता असूनही प्रयत्न करणे टाळते.
अशा वेळी आत्मविश्वास कमी होतो, निर्णय क्षमतेवर परिणाम होतो आणि भविष्याबद्दल नकारात्मकता वाढते.
पण ही अवस्था कायमची नसते. लहान सकारात्मक अनुभव, जवळच्यांचा आधार आणि छोट्या प्रयत्नांची यशस्वी उदाहरणे मनाला पुन्हा उभं करू शकतात.
आपण नियंत्रणात असलेल्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं तर हळूहळू मनाचा विश्वास परत येतो.
परिस्थिती कठीण असली तरी प्रयत्नांची किंमत असते, कारण प्रत्येक छोटं पाऊल पुढच्या बदलाची शक्यता वाढवतं.
प्रवीण पप्पू शिंदे
राज्य उपाध्यक्ष. राज्य मराठी पत्रकार परिषद
महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव. अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन



















