जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
एका मुस्लिम शासकाच्या काळात हिंदूंना आपल्या धर्मस्थळाची दुरुस्ती करण्यासाठी किंवा तिथे जाण्यासाठी काय-काय करावं लागायचं, याबद्दल Gujarat मधल्या Junagadhची एक रोचक ऐतिहासिक गोष्ट :
इ.स. १८८९, ठिकाण जूनागढ. १८५७ च्या क्रांतीला ३२ वर्षे झाली होती. त्या वेळेस इंग्रजांनी जवळपास संपूर्ण भारतावर ताबा मिळवला होता & अनेक रियासती इंग्रजांच्या अखत्यारीत आल्या होत्या. त्यापैकी एक रियासत म्हणजे Gujaratमधील जूनागढ, ज्याचे नवाब बहादुर खान होते.
जूनागढमध्येच उंच गिरनार पर्वत आहे, जिथे Hindu धर्मातील शतकानुशतके जुने दत्तात्रेय मंदिर आहे. इथे केवळ हिंदूच नाही तर Jain धर्माचीही अनेक देवळं व देरासर आहेत.
आज गिरनार चढण्यासाठी ropeway & पायऱ्या आहेत. पण पूर्वी श्रद्धाळूंना सरळ डोंगर चढावा लागायचा. अनेक महिने लागायचे. अनेक लोक मृत्यूमुखी पडायचे किंवा जंगली प्राणी त्यांना मारायचे.
एके दिवशी नवाबांचे दिवाण हरिदास बिहारीदास देसाई & नवाबांचे personal assistant पुरुषोत्तमराज झाला यांनी योग्य वेळ पाहून नवाबांसमोर विनंती ठेवली की—
“हिंदू & जैन श्रद्धाळूंना गिरनारवर जाणं खूप कठीण होतंय. लोक मरत आहेत. तर वर जाण्यासाठी पायऱ्या बांधता येतील का?”
नवाबांनी मग Ahmedabadमधून एक British engineerला बोलावलं. त्याने पाहणी करून सांगितलं की गिरनारपर्यंत पायऱ्या बांधण्याचा खर्च १ लाख ३० हजार रुपये येईल.
१८८९ मध्ये १,३०,००० रु. ही अत्यंत मोठी रक्कम होती. नवाबांना हे ऐकून धक्का बसला & त्यांनी नकार दिला.
तेव्हा हरिदास देसाई & पुरुषोत्तमराज झाला म्हणाले—
“आपण सरकारी खजिन्यातून पैसे देऊ नका. आम्ही एक लॉटरी काढतो. लोक १ रुपयाची लॉटरी खरेदी करतील. आकर्षक बक्षिसे ठेवू. & लॉटरीच्या गजटमध्ये स्पष्ट लिहू की हा पैसा गिरनारसाठी पायऱ्या बांधायला वापरला जाणार आहे, त्यामुळे हिंदू-जैन लोक मोठ्या संख्येने लॉटरी खरेदी करतील.”
हे ऐकून नवाबांनी परवानगी दिली.
यानंतर १२ सदस्यांची एक कमिटी तयार झाली, ज्यांचे प्रमुख होते बेचरदास बिहारीदास.
१ ऑक्टोबर १८८९, १ रुपयांची लॉटरी जाहीर करण्यात आली. पहिलं बक्षिस ४०,००० ठेवण्यात आलं, नंतर ते १०,००० केले. सर्वात कमी इनाम ५ रुपये होतं. लॉटरीची जाहिरात Junagadhच्या राज्य गजट “दस्तूर-उल-अमल सरकार” मध्ये प्रकाशित झाली.
लॉटरीची स्कीम आकर्षक होती—
१२ तिकिटे खरेदी केली तर १ तिकीट फ्री
१०० तिकीट विकणाऱ्याला १५% कमिशन
न विकलेली तिकिटे परत करण्याची सोय
हे पाहून हिंदू, मुस्लिम, सिख & अगदी इंग्रजांनीही मोठ्या प्रमाणावर लॉटरी खरेदी केली.
१५ मे १८९२, रविवार—लॉटरीचे निकाल जाहीर होणार होते. भारतभरातून हजारो लोक जूनागढला जमले. तिकिटे Farazkhan यांच्या घरात ठेवली होती. कमिटीने पूर्ण पारदर्शकतेने ड्रॉ काढला.
एकूण १,२८,६६३ तिकिटे विकली गेली.
१०,००० रुपयांचं पहिलं बक्षिस मुंबईतील सविताबेन दाह्याभाई खांडवाला यांना मिळालं. त्यांनी संपूर्ण रक्कम गिरनारच्या पायऱ्या बांधण्यासाठी अर्पण केली. (१८९२ मधील १०,००० रु.= आजचे जवळपास १०० कोटी)
दुसरं बक्षिस २,५०० रु. पंजाबच्या खुदाबक्ष & लालचंद यांना मिळालं.
तिसरं बक्षिस १,५०० रु. नवसारीच्या बलवंतराय यांना मिळालं.
लॉटरीतून जवळपास १ लाख ३० हजार रुपये जमा झाले & British engineerच्या देखरेखीखाली पायऱ्या बांधण्याचं काम सुरू झालं.
पायऱ्या बांधायला १९ वर्षे लागली.
आज आपण गिरनारवर सहज पायऱ्यांनी चढतो, पण हे विसरून जातो की आपल्या पूर्वजांनी त्यासाठी किती मोठी मेहनत, धावपळ & आयोजन केलं होतं.
ज्या फोटोमध्ये दिसतंय, ते त्या जुन्या गिरनार लॉटरीचं तिकीट आहे, ज्यावर लिहिलं आहे की या लॉटरीसाठी जूनागढच्या नवाबांनी विशेष परवाना दिला आहे. डाव्या बाजूला लॉटरी कमिटीचे secretary पुरुषोत्तम के. गांधी यांचं नाव लिहिलेलं दिसतं.


















