*बांधकाम व्यावसायिक भूषण पालरेषा विरोधात नागरिकांची निदर्शने*
ज्ञानेश्वर पाटेकर
केसनंद तालुका हवेली येथील व्ही टी पी पूर्वांचल या उच्चभ्रू सोसायटी मध्ये फ्लॅटधारकांनी लाखो रुपये गुंतवून फ्लॅट घेतले असून या परिसरातील ही सर्वात उच्चभ्रू सोसायटी मानली जात होती येथील फ्लॅटचे दर गगनाला भिडले असताना अचानक पणे फ्लॅट धारकांचे पिण्याचे पाणी बंद करून येथील कचरा न उचलता मूलभूत सुविधांपासून नागरिकांना अचानकपणे वंचित केल्यामुळे येथील फ्लॅट मधील रहिवाशांनी पुण्यातील प्रसिद्ध वि टी पालरेषा अर्थात भूषण पालरेषा या बांधकाम व्यावसायिका विरोधात निषेध मोर्चा काढून या पुढील काळात सोसायटीसमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे, तसेच बांधकाम व्यावसायिक भूषण पालरेषा विरोधात व्ही टी पी चे मुख्य कार्यालय असलेल्या पुणे नगर रस्त्यावरील शक्ती स्पोर्ट्स समोर नागरिक हातामध्ये फलक घेऊन उभे राहणार असून व्ही टी पी प्रशासनाचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याचे प्रतिपादन फ्लॅट धारकांनी केले आहे व्हीटीपी पूर्वांचल मधील फ्लॅट धारकांचे अचानकपणे पाणी बंद करून सोसायटी स्थापन न करता सोसायटीचे हस्तांतरण करता अचानकपणे मेंटेनन्स मधून बिल्डरने अंग काढून घेतल्यामुळे सोसायटीमधील फ्लॅट धारकांचे अतोनात हाल सुरू असून बिल्डर विरोधात ८०० फ्लॅट मालकांनी रस्त्यावर उतरून अनोख्या पद्धतीने निषेध मोर्चा काढून सोसायटीच्या आवारात आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे, यापुढील काळात न्याय न मिळाल्यास रेराकडे व न्यायालयामध्ये जाण्याचा फ्लॅट मालकांनी व्ही टी पी बिल्डरला इशारा दिला असून या संदर्भात बांधकाम व्यवसायिक भूषण पालरेषा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या व्यवस्थापनाने लेखी स्वरूपात उत्तर दिले आहे,भूषण पालरेषा हाय हाय म्हणत सोसायटीमध्ये फ्लॅट मालकांनी घोषणा देऊन व्ही टी पी चोर है म्हणत फ्लॅटधारकांनी टाहो फोडला असून रेरा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात दाद मागणार असल्याचे प्रतिपादन फ्लॅट मालकांनी केले आहे या संदर्भात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी लेखी स्वरूपात फ्लॅट मालकांना रेरा प्रशासनासाठी पत्र देऊन दिलासा दिला आहे.




















