*”
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
भारत उद्योग गौरव पुरस्कार 2025
अंतर्गत Inspiration Women Empowerment Award
प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या हस्ते
साई दिवाळी फराळ
मंचर ता.आंबेगाव,पुणे
या उपक्रमाच्या सहा महिला उद्योजिकांना सन्मानित करण्यात आले.
ही प्रेरणादायी सहा महिला उद्योजिका – सौ.सोनाली बेंडे, सौ.वैशाली चौधरी,सौ.योगिता पोखरकर, सौ.शितल दैने, सौ.रेश्मा शेटे,सौ.गीतांजली कडधेकर.
साई दिवाळी फराळ – “दिवाळी गावाकडची”,
घरगुती व पारंपारिक पद्धतीने डोळ्यासमोर बनवलेला,
शुद्ध देसी तूप व जेमिनी सूर्यफूल तेलात तयार होणारा फराळ,आता आकर्षक गिफ्ट बॉक्स पॅकिंगमध्ये कॉर्पोरेट जगात
दिवाळी गिफ्ट म्हणून लोकप्रिय झाला आहे.
या उपक्रमातून 350 हून अधिक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला असून,
त्यांच्या हातची चव आज 30 ते 35 देशांपर्यंत पोहोचली आहे.
शहरातील गतिमान जीवनशैलीत महिलांना वेळ न मिळाल्याची गरज ओळखून,
या सहा महिला उद्योजिकांनी महिलांनी महिलांसाठी
एक वेगळा, सशक्त आणि संवेदनशील उद्योग उभा केला जो आज प्रत्येक घरात *“गावाकडच्या चवीचा”* सुगंध घेऊन पोहोचतो आहे.




















