जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
वारकरी संप्रदायाचे शेतकरी अर्जुन यशवंत डोके वय 75 यांचे अल्प आजाराने आज दि अकरा रोजी सकाळी नऊ वाजता पुणे येथे निधन झाले
त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी जावई असा परिवार आहे
श्रमिक रामदास क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे वाशी मुंबई चे संचालक पदी ते कार्यरत होते
वडगाव काशिंबेग येथील घोडनदी तीरावर दि 11 रोजी सायंकाळी 5 वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम होणार असल्याचे डोके कुटुंबीयांनी सांगितले आहे
प्रसिद्ध बैलगाडा मालक व श्रीकृष्ण पतसंस्थेचे माजी चेअरमन , एकलहरे शाखा व्यवस्थापक महेशशेठ डोके यांचे ते वडील होते


















