*🌾🎋
जिल्हा प्रतिनिधी पुणे. प्रवीण पप्पू शिंदे
*मंचर गटातील सुलतानपूर येथील ऊस उत्पादक युवक शेतकरी श्री मनोहर भीमराव बागल यांनी दि.3/10/2025 रोजी कारखाना ऊसरोपे पुरवठा करार असणारी तुकाई नर्सरी बारामती यांची को 86032 ऊस रोपे घेऊन लागवड केली असून लागवड 1 महिना + झाली असून आज पर्यंत त्यांनी विद्राव्य खते + अन्नद्रव्य + ह्युमिक ऍसिड +कीटकनाशक + बुरशीनाशक अशा अळवण्या केल्या आहेत त्यामुळे ऊसरोप व्यवस्थित सेट होऊन आज प्रति रोपास 4 ते 5 फुटवे आलेले आहेत खुरपणी साठी मजुरांचा अभावअसल्याने छोटी फन्नी+फास असलेले आवजार वरंब्यावर चालवताना सरित जास्त माती पडून येणारे फुटवे थांबणार नाही व फुटवे गाडणार नाही याची काळजी घेऊन खुरपणीस पर्याय अशी मशागत केली आहे त्यामुळे रासायनिक खताची पहिली खत मात्रा पाणी भरते वेळी माती आढ होईल त्याचा परिणाम ऊस वाढीवर चांगला होईल त्यानंतर ऊस दोन महिन्याचा झाल्यानंतर मजुराच्या साह्याने बाळभरणी करते वेळी रासायनिक खताची दुसरी खतमात्रा देण्याचे त्यांचे नियोजन आहे त्यांनी 4 × 2 अंतराने ऊसरोपे लागवड केली आहे म्हणजेच एकरी 5500 रोपे लागली आहेत त्यासाठी प्रति रोपास 10 फुटवे अपेक्षित आहेत म्हणजेच 55000 ऊस एक रात तयार होतील आणि त्याचे व्यवस्थापन करून प्रत्येक उसाचे वजन 2kg अपेक्षित धरले तर एकरी 100 टन उत्पादन मिळेल या उद्देशाने त्यांनी व्यवस्थापन करण्याचा त्यांचा मानस आहे.*


















