*
*लोहगावातील रहिवाशांची चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी*
ज्ञानेश्वर पाटेकर
लोहगावमधील डी. वाय. पाटील रोडवरील ३६ मीटर डीपी प्लॅन रस्त्याच्या प्रस्तावित विस्ताराविरोधात अनेक नागरिकांची घरे जाऊन त्या बदल्यात त्यांना पैसे दिले जाणार आहेत, आम्हाला पैसे नको त्यापेक्षा तुम्ही तुमचा प्रास्ताविक प्लॅन सुधारित करा अथवा बदला अशी मागणी लोहगाव मधील चिरके कॉलनी व परिसरातील नागरिकांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रस्ताव देऊन केली आहे, अनेक नागरिकांनी याप्रसंगी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या असून मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा याप्रसंगी नागरिकांनी दिला आहे,
लोहगाव दौऱ्यादरम्यान चिरके कॉलनीच्या नागरिकांच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्याकडे सर्व रहिवाशांच्या स्वाक्षरीसह अर्ज सादर करण्यात आला असून त्यामध्ये लोहगावमधील डी. वाय. पाटील रोडवरील ३६ मीटर डीपी प्लॅन रस्त्याच्या प्रस्तावित विस्ताराविरोधात नागरिकांनी त्यांना पैसे नको आहेत, त्यांना सद्यस्थितीतील रस्ता जसे आहे तसे हवा आहे ज्यामध्ये किरकोळ बदल स्वीकार्य आहेत,
नागरिकांनी म्हटले आहे की २० फूट रुंदीचा रस्ता १२० फूट करण्यासाठी चिरके कॉलनीतील नागरिकांच्या घरांचे नुकसान होऊन त्यांना हटवले जाणार आहे, त्याऐवजी नवीन जागा शोधून १२० फूट रस्ता बांधण्यात यावा.
टाउनशिप प्लॅनिंगमध्ये रस्त्याची रुंदी कमीत कमी ठेवण्यात यावी, जेणेकरून नागरिकांचे नुकसान होणार नाही.
चंद्रकांत पाटील यांनी अर्ज स्वीकारताना नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी वेळ दिला जाईल, आमचे स्वीय सहाय्यक या संदर्भात चर्चा करतील असे आश्वासन याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत

















