*
ज्ञानेश्वर पाटेकर
अवसरी बुद्रुक पंचायत समिती गणा मधून राज्य माथाडी कामगार युनियनचे सचिव प्रवीण उर्फ पप्पू शिंदे यांनी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे प्रतिपादन केल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले असून शिंदे यांना दिवसेंदिवस सर्व स्तरांमधून पाठिंबा वाढत चालला आहे
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी ते महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव, अखिल भारतीय माथाडी आणि ट्रान्सपोर्ट युनियन महाराष्ट्र प्रदेश प्रवास असा शून्यातून केलेला प्रवास तसेच गणामध्ये नातेगोते सोयरे असल्यामुळे व कै दगडू नाना मारुती शिंदे संचालक. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना त्यांच्याकडून तालुक्यातील राजकारणाचे बाळकडू घेऊन एकेकाळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा कर्मचारी ते माथाडी व जनरल युनियन कामगार पदाधिकारी पर्यंत प्रवास करून सामाजिक व कामगार संबंधी प्रश्नाची उत्तम जाण असल्यामुळे भावी काळात शिंदेंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे
कै. शशिकांत उर्फ आप्पासाहेब पवार अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष असून त्यांचे चिरंजीव वीरेंद्र भैय्यासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभाग घेऊन मराठा समाजाची प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी मदत केली असून सध्याचे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचे दिलीप दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहे, मराठा आंदोलनासाठी लढा देत असलेले खासदार संभाजी राजे भोसले यांना निवेदन देत असून मराठा आरक्षणासाठी व चळवळीत सातत्याने काम करून पुढाकार घेण्याचे काम केले आहे मनोहर उर्फ बुवा वाडेकर मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा यांनी शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे


















