ज्ञानेश्वर पाटेकर
लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील बुर्केगाव येथून लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी खास ‘विशेष सहल’ आयोजित करण्यात आली. कात्रज सर्पोद्यान (राजीव गांधी प्राणी संग्रहालय) येथे घेण्यात आलेल्या या सहलीत विद्यार्थ्यांना निसर्ग, प्राणीविश्व आणि पर्यावरणाची प्रत्यक्ष ओळख करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या योगेश झुरुंगे यांच्या संकल्पनेतून लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील मुलांसाठी ही सहल आयोजित करण्यात आली. योगेश भाऊ झुरुंगे मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या या सहलीत ७० पेक्षा अधिक मुलांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात आपला आनंद व्यक्त केला आणि आयोजकांचे आभार मानले.
सहलीचा शुभारंभ माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे, माजी चेअरमन बाळासाहेब ठोंबरे, बैलगाडा मालक शंकर ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बाजारे, भिवाजी शिंगटे, जयसिंग ठोंबरे, बबन जांभळकर, गणेश पोकळे, विक्रम ठोंबरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गस्थ करण्यात आली.
लहान मुलांचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने योगेश झुरुंगे यांनी ही सहल राबविली. या सहलीच्या नियोजनात भाऊसाहेब ठोंबरे, किरण सोनवणे, भिमा ठोंबरे आणि सागर झुरुंगे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
देवदर्शन यात्रांचे आयोजन सामान्यतः मतदारांवर लक्ष ठेवून केले जात असते, मात्र लहान मुलांसाठी घेतलेल्या या सहलीबद्दल सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जनतेच्या सेवेसाठी सदैव पुढाकार घेण्याच्या भूमिकेतून मुलांचा उत्साह पाहून सहलीचे आयोजन केल्याचे सागर झुरुंगे यांनी सांगितले. मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हाला आनंद झाला असून अशा प्रकारच्या आणखी आठ ते दहा सहलींचे नियोजन सुरु आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार भविष्यात अशा उपक्रमांची संख्या वाढविणार असल्याचेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.


















