*
जिल्हा प्रतिनिधी. प्रवीण पप्पू शिंदे
पिंपरी चिंचवड. दत्ता मोकाशी सर
1️⃣ सेवानिवृत्त नंतर पहिल्या निवृत्ती पश्चात दिवाळीत असे लक्षात घेतलं की या वेळी शुभेच्छा द्यायला अथवा कोणीही भेटण्यास आलेलं नव्हतं.
2️⃣ सेवेत असताना दरवर्षी दिवाळीच्या आधी घरी भेटवस्तू, मिठाई आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असे.
3️⃣ सेवानिवृती नंतर या दिवाळीत , या नवीन वर्ष वेळी शांतता आणि एकटेपणाने जाणवला.
4️⃣ मन विचलित झाल्याने वृत्तपत्रातील आध्यात्मिक स्तंभ वाचू वाचला असता एका गाढवाची कथा सापडली.
5️⃣ गाढव देवी-देवतांच्या मूर्ती पाठीवर वाहून नेत असतं, आणि लोक त्या मूर्तींना वंदन करत असतात — पण गाढवाला वाटतं की लोक त्यालाच प्रणाम करत आहेत.
6️⃣ जेव्हा मूर्ती उतरवून परत येताना त्याच्या पाठीवर भाज्या असतात, तेव्हा कोणी त्या गाढवाकडे कोणी लक्षही देत नाही. गाढव मात्र रेंकून लोकांचं लक्ष वेधू पाहतो पण कोणी लक्ष देत नाही.
7️⃣ रैंकनाऱ्या गाढवावर लोक रागावतात आणि त्याला मारतात, गाढवाला समजत नाही की सन्मान मूर्तींसाठी होता, त्याच्या साठी नव्हता.
8️⃣ वरील बाबी वाचता, पाहता अचानक जाणवलं की तोही आयुष्यभर त्या गाढवासारखाच होता — पद आणि प्रतिष्ठेच्या अहंकारात जगणारा.
9️⃣ सेवानिवृत्त यांची पत्नीही उपरोधिक पणे म्हणाली, “मी इतकी वर्षं सांगत होते की तू गाढव आहेस, पण आज अखेर तुला पटलं.”
🔟 सन्मान पदाचा नसतो, तर व्यक्तिमत्त्वाचा असतो — आणि खरा आनंद साधेपणा, विनम्रता आणि माणुसकीतच असतो म्हणून जीवनात जीवन जगा की सेवेत असताना कोणाचे प्रलोभन, लाभ, मान , सन्मान अपेक्षा न ठेवता पदाचा अहंकार निर्माण न करता त्या पदास कार्यास न्याय द्या व राहा जेणे करून सेवेत असताना व सेवानिवृत्ती नंतर चे जीवन आनंददायी राहील.
*बोध*..
*जीवनात पद, पैसा, सत्ता क्षणभंगुर आहेत. फक्त आपले चांगलं वर्तन आणि साधं राहणीमान, कोणतेही शासकीय अथवा अशासकीय पद, अथवा कोणताही व्यवसाय या मध्ये जीवनात आपण निर्मित केलेले प्रामाणिक योगदान तथा सेवा, हेच आयुष्यभर लोकांच्या मनात राहतात आणि हेच खरे जीवन स्वतः ला आत्मसन्मान निर्माण द्वारे लाभत असते.


















