**
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
*येणार्या वीस पंच वीस वर्षांत नसुन येत्या 2035 वर्षात आपल्या घरातील काही नाती ही कायम साठी संपणार आहेत.*
*दादा, वहीनी.*
*दीर, छोटी जाऊ.*
*भाया, मोठी जाऊ.*
*काका, काकी.*
*नणंद, नंदावा*
*आत्या, मामा.*
*मावशी, काका.*
*ताई, दाजी.*
*या सहीत अनेक नाती आमच्या घरातून संपणार आहेत.*
*बस फक्त अडीच तीन माणसांचा परीवार शिल्लक राहाणार आहे, ना हिंमत देणारा मोठा भाऊ असेल, ना हुशार, चुणचुणीत असा छोटा भाऊ असेल…..*
*ना घरात वहीनी असेल…*
*ना कोणी छोटा दीर असेल,*
*सून सुद्धा एकटीच असणार,*
*ना तिला कोणी जाऊ…*
*ना कोणी खट्याळ नणंद,*
*ना चलाख, चपळ आत्या…*
*एकूणच काय तर, एकच मुल ही फॅशन आणि फक्त मी मी पणाची मूढता आणि अज्ञानता…*
*परीवार संपत आहेत,*
*दोन भावांचे परीवार सुद्धा आता शेवटच्या टप्प्यावर आहेत. आधी मातीच्या कच्च्या घरात सुद्धा मोठमोठे परीवार राहात होते. आता मोठमोठ्या बंगल्यात केवळ अडीच तीन राहाण्याची फॅशन आली आहे. हे सर्व पाहून मनाला फारच वेदना होत आहेत.*
*या अशा परिस्थितीत आम्ही एकुलत्या एका मुलावर काय काय जबाबदारी देऊ शकतो… त्याला कठीण प्रसंगी बळ, हिंमत कोण देणार…? भाऊ नसल्यावर त्याच्या खांद्यावर मदतीचा हात कोण ठेवणार…?*
*शहरीकरन. वाढती लोकसंख्या गाव सोडून शहराकडे पलायन राहण्याची समष्या हा एक चिंतेचा विषय होत आहे. आपल्याला आपला ट्रेंड बदलावाच लागणार आहे.*
*मुलांच्या लग्नाचे वय २० ते २४ पर्यंत निश्चित केले पाहीजे….*
*आज सेटल होण्याच्या नादात हे वय ३० ते ३५ पर्यंत ढकलले जात आहे. यातच जवळ जवळ एका पिढीचे अंतर पडत आहे. तुम्ही सेटल होऊन यशस्वी होता, तोपर्यंत हुरुपाचे वय, अर्धे आयुष्य निघून गेलेले असते.*
व सर्वात महत्वाचे म्हणजे ” हम दो… हमारा एक ” अशी कुटुंब व्यवस्था केल्यामुळे… गावी कोण लक्ष देणार.. मग गावचे घर बंद.. सणा सुदीला सुद्धा जायला मिळेल की नाही… याची खात्रीच देता येत नाही.. कारण इकडे मुंबईला ” हम दो ” हे कामावर.. व ” हमारा एक ” हा स्वतःच्या करिअर मध्ये गुंतलेला..
एक विदारक सत्य आहे..
म्हणून आपली कुटुंब वाढली पाहिजेत.. कोणाला पटो अथवा न पटो… पण आपल्या पूर्वज यांनी जी कुटुंब व्यवस्था अवलंबीली होती ना.. तीच बरोबर होती…
*विचार करण्यासारखीच ही बाब आहे..


















