*एक
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेला *कु.रोहन विलास बोंबे वय वर्ष-१३* या लेकराला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून पेठ वनविभाग कार्यालय या ठिकाणी ठिय्या आंदोलन आता थांबायचं नाय!! बिबट्या नको… मोकळा श्वास हवा!!
जुन्नर, आंबेगाव, शिरूर बिबट मुक्त करण्यासाठी निकराची लढाई सुरू…..
या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हा!! आपल्या लेकरांचे, जनावरांचे हकनाक बळी जाण्यापासून रोखायचे असतील तर आजपासून आपला वेळ द्या.. आंदोलनात सहभागी व्हा!!!
उद्या सोमवार दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी गाव पूर्ण बंद ठेऊन दुपारी १:०० वाजता वनविभाग कार्यालय पेठ येथे ठिय्या आंदोलनासाठी सर्व महिला पुरुष मुले सर्वांनीच उपस्थित राहा..
झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी, वनविभागाला वठणीवर आणण्यासाठी आपल्या सर्वांना यावेच लागेल….
प्रमुख मागण्या
संपूर्ण बिबट मुक्ती
या मागणीसाठी सर्वानी उद्या वनविभाग कार्यालय पेठ घाट येथे सगळी कामे बाजूला ठेऊन ठिय्या आंदोलनासाठी सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर दुपारी १२:०० वाजता उपस्थित राहा…
लक्षात ठेवा उद्या हजर नाही राहिलात तर बिबट्याच्या हल्यात पुढचा नंबर तुमचाच असेल!
हा लढा कोणत्याही पक्षाचा, धर्माचा किंवा जातीचा नाही.. लढा आपल्या जगण्याच्या हक्काचा आहे. सर्वांनी सहभागी व्हा!
आपले नम्र
समस्त ग्रामस्थ आंबेगाव तालुका

















