.!
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
मंचर येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री रोहिदास मारुती बाणखेले यांनी दि.1 जानेवारी 2024 मध्ये 0265 जातीचा तोडणी केलेल्या ऊसाचे खोडवा ऊसपिक घेतलेले असून कारखाना मार्गदर्शनाने त्यांनी ऊस बुडखे छाटणी करून त्यावर किटक व नाशकाची फवारणी करून 15 दिवसाचे आत बगा फोडणी करून रासायनिक खताची पहिली खत मात्रा दिल्यात्यानंतर पाणी व्यवस्थापन करून कारखाना उत्पादित ॲझोफॉस्पो हे द्रवरूप जिवाणू खत एकरी 2 लिटर प्रमाणे पाटपाण्यातून दिले त्या नंतर 50 दिवसानी एकरी दोन बॅग युरिया या प्रमाणे खताची दुसऱी खत मात्रा दिली पाणी दिल्यानंतर 19: 19: 19 + किटक नाशक + बुरशी नाशक फवारणी केली पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी कारखाना उत्पादित ॲसिटो बॅक्टर जिवाणू खत +वसंत ऊर्जा या संजीवकाची फवारणी केली त्यानंतर ऊस साडेतीन महिन्याचा असताना रासायनिक खताची तिसरी खत मात्रा देऊन मोठी बांधणी केली नंतर त्यापुढे ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन केले ऊस कांडीवाढीच्या अवस्थेमध्ये असताना चे मल्टी मायक्रो + मल्टी मायक्रो या सूक्ष्म अन्नद्रव्य व द्रवरूप खताची फवारणी केली आहे सांगायचे तात्पर्य ऊस खोडवा व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने आज 10+ महिन्याचा ऊस असून 25 ते 26 कांडी ऊसास आहेत याचे महत्त्वाचे श्रेय हे कारखाना मार्गदर्शना नुसार शेतकऱ्यांनी केलेले व्यवस्थापन व कष्ट होय.

















