पत्रकार, प्रवीण पप्पू शिंदे यांचा ” हे विचारप्रवर्तक व संबंधित घटकांना अंतर्मुख करणार्या अग्रलेखाचा सुसूत्र,सविस्तर गोषवारा असा:—
शांती,बंधुता आणि परस्परआदर हा धार्मिक सौहार्दाचा खरा आधार आहे.इस्लामसह प्रत्येक धर्माचा आत्मा आहे.प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर श्रद्धा असायलाच हवी.त्यात काहीच गैर नाही. इस्लाममध्ये मूर्तीपूजा, मोहंमद पैगंबर यांची कोणतीही प्रतिमा,चित्र किंवा पुतळा तयार करणे निषिद्ध आहे.कारण इस्लामचा मुख्य संदेश कोणत्याही पुतळ्याची किंवा प्रतिमेची पूजा करण्यावर नाही,तर एकाच देवाच्या भक्तीवर आधारित आहे. पैगंबरांनी एकेश्वरवादाचा संदेश दिला.त्यांनी सर्व प्रकारच्या मूर्तीपूजेचा निषेध केला.इस्लाममध्ये आपल्या मोहंमद पैगंबर यांच्यावर प्रेम दाखविण्याचा मार्ग म्हणजे त्यांच्या मार्गाचे अनुसरण करणे आणि त्यानुसार वागणे.
कानपूर,बरेली,
अहमदाबाद जालंदरसह देशभरात गेल्या काही काळात ” आय लव्ह मोहंमद ” अभियानाचे पडसाद उमटले.उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये “आय लव्ह मोहंमद “असे लिहिलेले पोस्टर्स,भिंतीवरील मोठे बॅनर आणि झेंडे अलिकडे दिसू लागले.हे बॅनर धार्मिक प्रेमाचे प्रदर्शन म्हणून सादर केले जात असले,तरी त्यामागे खोलवर राजकीय हेतू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.ही केवळ एक साधी घोषणा नाही,तर धार्मिक भावना भडकवण्याचे आणि समाजात तणाव निर्माण करण्याचे जाणूनबुजून केलेले षडयंत्र आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमधून सुरू झालेले “आय लव्ह मोहंमद” अभियान थेट अहिल्यानगरपर्यंत पोचले आहे.त्यावरून दंगली सुरू झाल्या आहेत. प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्यावर श्रद्धा असायलाच हवी परंतु ज्यांच्यावर श्रद्धा ठेवायची,त्यांच्याच विचाराला तिलांजली देणे चुकीचे आहे.कारण इस्लाममध्ये मूर्तीपूजा, मोहंमद यांची कोणतीही प्रतिमा,चित्र किंवा पुतळा करणे निषिद्ध आहे.
उत्तर प्रदेशनंतर देशभरात ठराविक मुस्लिम समुदायांमध्ये आजकाल एक नवीन ट्रेंड दिसून येत आहे.मोहंमद पैगंबर यांचे चित्र तयार करण्यास मनाई असताना अशा भावनिक घोषणांद्वारे धार्मिक आणि राजकीय फायदा मिळविण्याचे प्रयत्न न्याय्य मानले जाऊ शकतात का हा खरा प्रश्र्न आहे.येथे प्रश्र्न मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल प्रेम किंवा आदर आहे की नाही हा नाही,तर प्रेम कसे व्यक्त केले जात आहे हा प्रश्र्न आहे.प्रत्येक निवडणुकीच्या हंगामात विशिष्ट समुदायाच्या भावना भडकवून मते मिळवणे ही एक सामान्य पद्धत बनली आहे.’ आय लव्ह मोहंमद ‘चळवळही असाच खेळ खेळत असल्याचे दिसते. एखाद्या परिसरात एक गट ‘आय लव्ह मोहंमद ‘ चे झेंडे किंवा बॅनर घेऊन जातो,तेव्हा दुसरा गट त्याला चिथावणी देणारे कृत्य मानतो.हळूहळू वातावरण तापते आणि लहान वाद मोठ्या दंगलींमध्ये रूपांतरित होतात.प्रशासन,धार्मिक भावनांचा विषय म्हणून, अनेकदा घोषणा देणार्या आणि पोस्टर चिकटवणार्यांवर कठोर कारवाई करत नाही. अशाप्रसंगी ज्या इस्लाम धर्मात चित्रे आणि मूर्तींसारख्या गोष्टींना स्थान नसते,तेव्हा या पोस्टर्सना धार्मिक स्वातंत्र्य कसे मानले जाऊ शकते असा प्रश्र्न पडतो.त्यामुळे धार्मिक भावनांचे कारण पुढे करून कठोर कारवाई टाळणार्या प्रशासनाचा हा हलगर्जीपणा स्पष्ट निदर्शनास येतो व या हलगर्जीपणामुळे हे कट फोफावत आहेत.
भारताचा इतिहास धार्मिक कट्टरता आणि दंगलींनी भरलेला आहे. एक छोटीशी ठिणगी मोठ्या स्फोटात बदलू शकते.ब्रिटिश काळापासून आजपर्यंत ‘फोडा आणि राज्य करा ‘ या धोरणाची वारंवार पुनरावृत्ती झाली आहे. फरक एवढाच आहे,की राजकारणी आता आधुनिक पद्धती वापरत आहेत.पोस्टर्स,बॅनर आणि घोषणा या आधुनिक शस्राचा भाग आहेत.कोणत्याही परिस्थितीत इस्लामिक विद्वानांनी सामान्य जनतेला हे पटवून दिले पाहिजे,की मोहंमद पैगंबर यांचे नाव राजकीय हेतूंसाठी वापरणे हे पाप आहे.खरे पालन म्हणजे त्यांच्या मूल्यांचा स्वीकार करणे.
खोलवर रूजलेल्या षडयंत्रांपासून उत्तर प्रदेश किंवा देशातील अन्य प्रांतांना वाचवायचे असेल,तर समाजाने सत्य ओळखले पाहिजे आणि त्यावर एकजूट झाली पाहिजे. अर्थात असे विषय एखाद्याच समाजापुरते, धर्मापुरते मर्यादित नाहीत.इतर धर्मांमध्येही धर्मवेडे आणि अंधश्रद्ध कमी नाहीत.त्यातील अनेकजण,व्यक्ती आणि संघटना राजकीय हेतूंनी प्रेरीत आहेत. त्यांच्यावरही बंधने आली पाहिजेत.आपल्या देशातच नव्हे,तर अन्य देशांमध्येही असे प्रकार सातत्याने घडत आहेत. अनेक राजवटी अशा कडवट विचारसरणीवर उभ्या राहिल्या आहेत. म्हणजेच हा प्रश्र्न ठराविक प्रांतापुरता किंवा ठराविक विचारांपुरता मर्यादीत नाही.धर्मांध किंवा धर्मवेडे बनून अनेक प्रांतांमधिल टोकाचे विचार करणारे गट रस्त्यावर उतरून आंदोलने करतात तेव्हा शासकांची वाटही अवघड बनते.किंबहुना, अनेक आंदोलनांमागे तोच छुपा हेतू असतो. काळाची,विज्ञानयुगाची पावले ओळखून याबाबत नव्या पिढीने शहाणे व्हायला हवे.ज्येष्ठ पत्रकार,संपादक डाॅ.प्रवीण महाजन यांनी अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर आपल्या संपादकीय अग्रलेखात केलेले हे अभ्यासपूर्ण भाष्य व विवेचन-विश्लेषण खरोखरच उल्लेखनीय, विचारप्रवर्तक,जबाबदार घटकांना अंतर्मुख करणारे व भावीपिढीला योग्य दिशा दर्शविणारे ठरते हे मात्र तितकेचप्रवीण पप्पू शिंदे खरे!————————पत्रकार प्रवीण पप्पू शिंदे


















