ऊस तंत्रज्ञान व व्यवस्थापनाची माहिती…!
आंबेगाव. प्रवीण पप्पू शिंदे
*मंचर येथील ऊस उत्पादक शेतकरी श्री आनंदराव तुळशीराम गांजाळे यांचे 0265 या उद्या जातीचा दि.1/6/2025 ऊस लागवड प्लॉट व्हिजिट दरम्यान त्यांनी ऊस लागवडी पासून ते आजपर्यंत नियोजनबद्ध ऊस व्यवस्थापन केले आहे परंतु ऊस जाती नुसार व्यवास्थापन करणे ही काळाची गरज आहे 0265 ही जात हि वातावरणातील बदल बुरशीजन्य रोगांना सहज बळी पडते त्या साठी फवारणी करणे फार महत्त्वाचे आहे गवताळवाढ या बुरशीजन्य काही ऊस बेटे आढळली त्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे सध्या स्थितीला कीटकनाशक प्लस बुरशीनाशकाची फवारणी करणे अतिशय गरजेचे असून कारखाना शिफारशीत रासायनिक खते डोस देऊन सरी फोडणे फार गरजेचे आहे त्या नंतर कारखाना गट ऑफिसला उपलब्ध असणारे vsi मल्टी मॅक्रो + मल्टी मायक्रो न्यूट्रिएंट ची फवारणी करावी हि अतिशय महत्त्वाची आहे कारण या पिरिएडमध्ये ऊस कांडी वाढीची सुरवातीची अवस्था असते त्यामुळे ही फवारणी अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस व्यवस्थापन करताना अतिशय कमी खर्चात व्यवस्थापन करण्यासाठी कारखाना मार्गदर्शन घ्यावे.*


















