आंबेगाव प्रतींनिधी – प्रवीण शिंदे .
मंचर, ता. आंबेगाव – रुक्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय, मंचर येथे आज सामाजिक बांधिलकीतून एक प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात आला. ओम साई केटरर्स, अवसरी खुर्द (भोरमळा) चे मालक श्री. वसंतशेठ सोपानराव टाव्हरे यांच्या वतीने विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणाची ऐसपैस व स्वादिष्ट मेजवानी देण्यात आली.या निमित्ताने संस्थेचे संस्थापक सचिव श्री. शिवाजी गोविंदराव चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन लष्करे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री. टाव्हरे यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी व्यक्त केले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी केलेले हे योगदान प्रेरणादायी असून, असे सहकार्यरूपी आशीर्वाद भविष्यातही मिळावे, हीच आमची प्रार्थना आहे.” हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला असून, सामाजिक एकोप्याचा आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणारा आहे.
