आंबेगाव प्रतिनिधी प्रवीण पप्पू शिंदे
अखिल भारतीय मराठा महासंघ व महिला मराठा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव अत्यंत भव्य, शिस्तबद्ध, प्रेरणादायी व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमानुसार सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पडले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शैलाताई येरम्म यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मुलींच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंचे औक्षण, पुष्पहार अर्पण, ओटी भरणे व लाडू वाटप करून जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी केली.
यानंतर आई जगदंबा भवानीचे पूजन, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याच प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष कै. शशिकांत पवार यांना विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीपदादा जगताप यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या सोहळ्यास खालील मान्यवरांची उपस्थिती लाभली :
• मा. दिलीपदादा जगताप – राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ
• श्री. राजेश घाणेकर – उपचिटणीस
• मा. महेश सावंत – महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
• क्रांती मोर्चाचे युवा नेतृत्व – मा. विरेन्द्र पवार
• मराठा बिझनेस फोरम – पंकज घाग (सेक्रेटरी)
• परब समाज मंडळ – मा. जी. एस. परब (अध्यक्ष)
• यशवंत सावंत, यश घोसाळकर
• इतिहास अभ्यासक व ओजस्वी वक्ते – मा. सत्यवान धुरी
• उद्योजिका व हितचिंतक – सौ. उल्का विश्वासराव
• मराठा समाज सेवा संघ – सुनील नलावडे
• संतोष तळेकर, संजय पंडित
• डॉ. ज्योती शिंदे, डॉ. सुचिता घाग
• ज्येष्ठ समाजसेविका – आशाताई परब
महिला मराठा महासंघ – योगदान
अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी, सभासद व सल्लागारांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
विशेषतः –
सल्लागार सौ.कविता विचारे,
सौ.रश्मी पवार ,सौ.शैलाताई येरम्म, सौ. स्नेहल परब (कांदिवली अध्यक्ष), विनिता पालांडे (कांदिवली सेक्रेटरी), प्रियांका राणे, नम्रता घोसाळकर, सलोनी महाडीक ,सुमन परब, सायली तळेकर, कामिनी माटावकर, उषाताई विचारे, सौ. लालन महाडिक, गोरेगाव अध्यक्ष सौ. अस्मिता मोरे, वैष्णवी पाटेकर, सौ. रंजना इंगळे, गोरेगाव सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा व महिला मराठा महासंघ सभासद ज्योत्स्ना गायकवाड, अनिता विचारे, मंगल चव्हाण, विजया मौजी, सौ. सिद्धी शिर्के, रिद्धी साळुखें, वैशाली भोसले (वाशी),वैशाली साळूखें,(मराठा मंदिर),समृद्धी खानविलकर ,आरती परब,मिसेस घाग..
कार्यक्रमातील विशेष आकर्षणे
• विनिता पालांडे यांनी काढलेली सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. व इतर कामे पार केली.
• शैलाताई येरम्म यांनी शालेय लेझीम पथकासोबत लहान मुलांसाठी स्वतः भेटवस्तू आणून दिल्या.
• उषाताई विचारे यांनी आर्थिक सहकार्य केले. तसेच मा.संभाजी दहातोंडे,उल्का विश्वासराव,संतोष घाग,मराठा समाज सेवा मंडळ,सुवर्णातीई पवार ,नम्रता भोसले, स्मिता वारंग विशेष आर्थिक सहाय्य
• हळदी–कुंकू, पुष्पगुच्छ देऊन स्वागताची सुंदर परंपरा जपली गेली.(सलोनी,स्नेहल,उषाताई,विनिता प्रियांका,नम्रता घोसाळकर,ज्योस्त्ना गायकवाड,रिद्धी,)
शिवकालीन देखावे व सादरीकरण
• प्रथमेश जोशी यांनी साकारलेला राजगड किल्ल्याचा संपूर्ण देखावा अतिशय वास्तवदर्शी होता.
• भूपेंद्र मणचेकर यांनी उभेहूब बुरूज डिझाइनचे गेट बॅनर तयार केले.
• चंदन मालवणकर यांनी राजमहालाचा देखावा साकारला.
• सौ. श्रुतिका गौरव शिर्के यांनी साडीवर साकारलेले जिजाऊंच्या जीवनावर आधारित पेंटिंग विशेष आकर्षण ठरले.
• सौ.जस्मिना शिंदे बदलापूर यांनी नाट्यरूपातून साकारलेले संवाद अंगावर शहारे आणणारे होते.
शिवकालीन युद्धकला
शिवबा प्रतिष्ठान ट्रस्ट, अंधेरी (पूर्व)
संस्थापक – श्री. संतोष साबळे
ट्रस्टी – सौ. वनिता साबळे
प्रशिक्षिका – सौ. कल्पना निवाते
तीन वर्षांपासून ते चाळीस वर्षांपर्यंतच्या महिलांनी सादर केलेली शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके अविस्मरणीय ठरली.
विशेषतः तलवारीचे प्रात्यक्षिक प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करणारे होते.
व्याख्याने व सादरीकरण
• मा. सत्यवान धुरी यांचे राजमाता जिजाऊंवरील ओजस्वी व्याख्यान
• बालकलाकार कुमारी सौम्या शिर्के यांचे प्रभावी सादरीकरण
• निवेदिका, लेखिका व कवयित्री सौ. पूर्णिमा शिंदे यांच्या विचारमंथनाने कार्यक्रमाला वैचारिक उंची मिळाली.
संयोजन व सहकार्य
• संपूर्ण डेकोरेशन – मा. वाडकर
• सतत आठ दिवस मोलाचे सहकार्य – मा. उतेकर
• मार्गदर्शन – मा. विरेन्द्र पवार, पंकज घाग, प्रशांत सावंत
• खजिनदार अनंत मोरे व चिटणीस धोंडू जाधव यांनी धावती भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
विशेष आभार
फक्त ८ दिवसांत कार्यक्रमाचे नियोजन करून
अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या अध्यक्ष सौ. सुवर्णाताई पवार, सरचिटणीस नम्रता भोसले, खजिनदार स्मिता वारंग
यांनी अक्षरशः कार्यक्रमाचा विडा उचलून शेवटपर्यंत जबाबदारी पार पाडली.
सकाळी ११ वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होईपर्यंत स्वतः सुवर्णा ताई पवार व नम्रता भोसले..
बॅनर बांधणे, मांडणी, स्वागत, सत्कार, चहा–नाश्ता, साहित्य व्यवस्था – सर्व कामे स्वतः उपस्थित राहून पार पाडली.
कार्यक्रम संपल्यानंतर
स्नेहल परब, प्रियांका राणे, विनिता पालांडे, रिद्धी साळुखें, वैशाली भोसले, नम्रता घोसाळकर, सायली तळेकर,सलोनी महाडीक
यांनी आवराआवरीत विशेष सहकार्य केले.
सौ.अस्मिता मोरे,वैष्णवी पाटेकर,रंजना इंगळे ह्यांनी स्वत:सामान उचलून कार्यालयात नेले …
संतोष तळेकर, संजय पंडित यांनी शेवटपर्यंत चहा, सामान बांधणी व वाहतुकीची जबाबदारी घेतली.
तरुण कार्यकर्ता चंदन विचारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सर्वात लहान सलोनी महाडिक हिने रात्री टेम्पो निघेपर्यंत जबाबदारीने उपस्थित राहून सर्वांची मने जिंकली.हा कार्यक्रम केवळ उत्सव नव्हता,
तर राजमाता जिजाऊंच्या संस्कारांचा, स्वराज्याच्या मूल्यांचा व महिला शक्तीच्या संघटनेचा जिवंत जागर होता.




















