॥
६
प्रवीण पप्पू शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
स्थळ: क्रांतीसिंह नाना पाटील ,भाजी मंडई,प्लाझा सिनेमा च्या बाजूला,दादर (प.)मुंबई ४०००२८
वेळ: दुपारी ३ .०० ते रात्री ९.००
जय भवानी ! जय शिवाजी !
ही पुण्यवान भूमी…
ही रणधुरंधरांची जन्मभूमी…
ही राजमाता जिजाऊंच्या संस्कारांनी पावन झालेली मातृभूमी…
नवीन वर्षाची मंगल पहाट दैवी, तेजस्वी व राष्ट्रमातेच्या रूपातील राजमाता जिजाऊ जयंतीने होत आहे, हे आपले परम भाग्य आहे. ज्या मातेनं शिवबा घडवला, स्वराज्याचा मंत्र दिला, धर्म-संस्कृतीचे रक्षण शिकवले – त्या जगदंबा जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्याचा हा पवित्र दिवस आहे.
ही केवळ तारीख नाही…
ही केवळ जयंती नाही…
हा स्वराज्याच्या मुळाशी असलेला संस्कारांचा महामेरू आहे!
ज्या मातेनं छत्रपती घडवला,
ज्या मातेच्या कुशीतून स्वराज्याचा सिंह जन्माला आला,
जिच्या शब्दांनी तलवार धारदार झाली
आणि जिच्या संस्कारांनी महाराष्ट्र उभा राहिला ..
त्या राजमाता जिजाऊंच्या पावन स्मृतीस अर्पण
नवीन वर्षाची मंगल, तेजस्वी आणि दैवी सुरुवात
१२ जानेवारी २०२६ रोजी
स्वराज्याच्या साक्षीने – राजगड किल्ल्याच्या छायेत
या ऐतिहासिक व प्रेरणादायी स्थळी,
शौर्य, संस्कार व स्वाभिमानाचा जागर करणारा
राजमाता जिजाऊ जयंती महोत्सव
भव्य, दिव्य व ऐतिहासिक स्वरूपात साजरा केला जाणार आहे.
महोत्सवाची वैशिष्ट्ये
• दिपप्रज्वलन, आई तुळजा भवानी पूजन.
राजमाता जिजाऊ औक्षण
* शिवकालीन देखावे व जिवंत इतिहास.
* राजगड किल्ला-प्रथमेश जोशी.
* “सौ. श्रृतिका गौरव शिर्के यांनी जिजाऊंच्या जीवनचरित्रावर आधारित साडीवर पेंटिंग साकारले असून, ही कलाकृती कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रसंगी स्वतः कलाकार सौ. श्रृतिका गौरव शिर्के उपस्थित राहणार आहेत.
* राजमाता जिजाऊचें नाट्यातून साकारलेले अंगावर रोमांच उभे करणारे संवाद- सौ.आरती ताई परब.
* शिवबा प्रतिष्ठान ट्रस्ट, अंधेरी पूर्व, शिवकालीन युद्धाकला पथक अध्यक्ष /संस्थापक श्री. संतोष सुदाम साबळे
ट्रस्टी :-सौ. वनिता संतोष साबळे
प्रशिक्षिका :-सौ. कल्पना करण निवाते
आमचे शिवरायांचे मावळे व जिजाऊच्या लेकी. जिजाऊ वंदना..शिव गर्जना ..
•. *राजमाता जिजाऊ ह्यांच्या विषयी ओजस्वी व्याख्यान
मा.श्री.सत्यवान धुरी.*
• राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित स्तुतिपर पोवाडे सादर करण्यासाठी
आपल्या कोकणकन्या कुमारी तन्वी राणे उपस्थित राहणार असून,
त्यांच्या सशक्त आवाजातून जिजाऊंच्या तेजस्वी कार्याचा गौरव अनुभवायला मिळणार आहे.
तसेच बालकलाकार कुमारी सौम्या शिर्के
आपल्या निरागस पण प्रभावी सादरीकरणातून
राजमाता जिजाऊंच्या स्मृती प्रेक्षकांच्या मनात अधिक खोलवर रुजवतील.
याच कार्यक्रमात
निवेदिका, लेखिका व कवयित्री सौ. पूर्णिमा शिंदे
राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती जागृत करण्यासाठी
आपले विचार, शब्द आणि काव्याच्या माध्यमातून
जिजाऊंच्या महान कार्याला उजाळा देणार आहेत.
हे केवळ कार्यक्रम नाहीत,
हे स्वराज्याच्या रक्तात वाहणारे संस्कार आहेत…
आवाहन
समस्त शिवप्रेमी बांधवांनो,
माननीय पदाधिकारी,
निष्ठावंत कार्यकर्ते,
गौरवशाली सभासद व
स्वराज्यप्रेमी जनतेनो —
राजमाता जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी,
स्वराज्याच्या इतिहासाला पुन्हा एकदा जिवंत अनुभवण्यासाठी,
आपल्या पुढील पिढीत राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी —
या पावन सोहळ्यास सहकुटुंब, सहपरिवार, मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,
असे नम्र पण ठाम आवाहन करण्यात येत आहे.
या… पाहा… अनुभवा… आणि अभिमान बाळगा!
कारण –
आपण त्या भूमीचे पुत्र आहोत, जिथे जिजाऊंनी शिवबा घडवला…!
॥ जय जिजाऊ ॥
॥ जय भवानी ॥
॥ जय शिवाजी ॥
अखिल भारतीय मराठा महासंघ
महिला मराठा महासंघ




















